Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा गांधीगिरी सप्ताह

पुणे : पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या, पेट्रोलची दरवाढ सहन करणाऱ्या पुणेकरांच्या सहनशीलतेला सलाम या गांधीगिरी आंदोलन सप्ताहाला पहिल्याच दिवशी गुरुवारी पुणेकरांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.

गांधीगिरी आंदोलन सप्ताहाचा प्रारंभ लक्ष्मी रस्त्यावरील कुलकर्णी पेट्रोल पंप येथे करण्यात आला. पेट्रोल दरवाढ सहन करणाऱ्या पुणेकरांना सलाम, तेल कंपन्या- मोदी सरकार झाले मालामाल, जनता झाली बेहाल,पेट्रोलची झाली दरवाढ, मोदी सरकार करते ग्राहकांची लूट, अशा घोषणा लिहिलेले फलक हातात घेऊन कार्यकर्ते उभे होते. पंपावर येणाऱ्या वाहन चालकांना पेट्रोलचे दर पत्रक आणि एक गुलाबाचे फूल भेट देण्यात आले.

हेही वाचा     –    महिला व मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने बारामती तालुक्यात ‘शक्ती अभियान’ राबविणार; उपमुख्यमंत्री अजित पवार

याप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि सप्ताहाचे संयोजक व माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, सुनील मलके, रमेश अय्यर, प्रथमेश आबनावे, शाबीर खान, प्रशांत सुरसे, सौरभ अमराळे, सुरेश कांबळे, चेतन अगरवाल, स्वाती शिंदे, प्राची दुधाणे, मोनिका कलाने, अनिता मकवाना, आयुब पठाण, रोहन सुरवसे, प्रवीण करपे, महेश अराळे, खंडू लोंढे,बाळासाहेब मारणे, किशोर मारणे, समीर गांधी, अनिल आहेर, विनोद रणपिसे, रामदास मारणे, डॉ. अनुप बेदी, दत्ता डुरे, गोरख पळसकर, उमेश कांची, अनिकेत सोनवणे, साजिद शेख, सुरेश नांगरे, प्रथमेश लबडे, अक्षय सोनवणे,नरेश धोत्रे, साहिल राऊत, चिलेश मोता, दिलीप लोळगे, किरण म्हात्रे, रोहन थोरात, अथर्व सोनार, किशोर वाघेला, राजाभाऊ नखाते, शोभा परभाने, सविता माळवे, ममता नेरळ आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

पेट्रोल दरवाढीच्या विरोधातील या आंदोलनाला पुणेकरांचा प्रतिसाद मिळाला. विधानसभेच्या आठही मतदारसंघांत हे आंदोलन होईल. त्यालाही पुणेकर चांगला प्रतिसाद देतील, असा विश्वास मोहन जोशी यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button