Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिवाळी बोनसची घोषणा केली.

पिंपरी : महापालिकेच्या आस्थापनेवरील साडेसहा हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळीपूर्वीच मोठी खुशखबर दिली आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिवाळी बोनसची घोषणा केली. त्यानुसार किमान महिन्याच्या पगाराएवढा हा बोनस या महिन्याच्या पगाराअगोदर दिवाळीपूर्वीच त्यांना मिळणार आहे. महापालिका आयुक्तांसह वैद्यकीय विभागातील अधिकाऱ्यांना लाखांत बोनस मिळणार आहे.

राज्यातील मोजक्याच हातावर मोजता येतील इतक्याच महापालिका दरवर्षी बोनस देत आहेत. मुंबई ही सर्वात मोठी आणि केरळ राज्याएवढा अर्थसंकल्प असलेली महापालिका तो देत नाही. पुणे महापालिकेच्या अगोदर तो जाहीर करून पिंपरी-चिंचवड महापालिकेने यावर्षी आघाडी घेतली. यावर्षी सेवानिवृत्त झालेले, राजीनामा दिलेले, व्हीआरएस घेतलेले तसेच निलंबित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाही बोनस मिळणार आहे. फक्त सहा महिन्यांपेक्षा कमी सेवा झालेले नवीन कर्मचारी आणि अधिकारी यापासून वंचित राहणार आहेत. तर मानधनावरील अधिकारी, कर्मचारी यांना वीस हजार रुपये दिले जाणार आहेत.

हेही वाचा    –        हर्षवर्धन पाटलाचं ठरलं! शरद पवारांच्या भेटीनंतर मुलाच्या स्टेटसवर ‘तुतारी

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी साडेआठ टक्के सानुग्रह अनुदानाशिवाय वीस हजार रुपये जादा बोनस म्हणून मिळणार आहे. त्यानुसार चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना किमान चाळीस हजार, तर प्रथम श्रेणीतील अधिकाऱ्याला अडीच लाख रुपये बोनस मिळणार आहे. अनेक अधिकारी त्यातून लखपती होणार आहेत. महापालिका आयुक्तांना तो किमान दोन लाख मिळेल. तर, त्यांच्यापेक्षाही जास्त महापालिका रुग्णालयातील काही ज्येष्ठ डॉक्टरांना तो जास्त म्हणजे अडीच लाख रुपयांपर्यंत मिळेल, असे महापालिकेच्या लेखा विभागातून सांगण्यात आले.

दरवर्षी महापालिकेच्या वर्धापनदिनी बोनस जाहीर करण्याची म्हणजे त्याचा आदेश काढण्याची पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेल्या वीस वर्षांपासूनची परंपरा आहे. ती यावेळी पाळली गेल्याने कर्मचारी सुखावला गेला. त्यांनी आनंद व्यक्त केला.

– बबनराव झिंजुर्डे, अध्यक्ष, महापालिका कर्मचारी महासंघ

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button