Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘शिक्षण हेच विकासाचे द्वार’; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

पुणे : शिक्षण ही मोठी ताकद आहे, शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण लागून विकासाचे द्वार खुले होत असल्याच मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज व्यक्त केले.

गोंडवाना विद्यापीठाचा अकरावा आणि बारावा दीक्षान्त सोहळा राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या प्रांगणात पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय  मंत्री सुधीर मुनगंटीवार, कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रविण पोटदुखे, वित्त व लेखाधिकारी सी ए भास्कर पठारे व्यासपीठावर उपस्थित होते. तर आमदार देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे,  जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल, प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह आदी मान्यवर  राज्यपालांच्या स्वागतप्रसंगी कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.

हेही वाचा –  ‘वीर सावरकर ब्राह्मण होते तरीही गोमांस खायचे’; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

याप्रसंगी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय  मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना राज्यपालांच्या हस्ते मानद डी. लिट. पदवी प्रदान करण्यात आली. तसेच राज्यपाल यांच्या हस्ते विविध परीक्षांमध्ये प्रथम स्थान, सुवर्णपदक आणि प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या पदविकांक्षींना आचार्य पदवी, पदव्युत्तर पदवी व पदवी प्रदान करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group