ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
नरहरी झिरवळांनी केले शरद पवारांचे तोंडभरून कौतुक
पवार हे आमच दैवत आहे आणि ते साहेब आहेत,आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य
महाराष्ट्र : विधानसभा उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांनी शरद पवार यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. शरद पवार हे आमच दैवत आहे आणि ते साहेब आहेत. त्यामुळे ते कोणाला उभं करत आहेत, हे अम्हाला माहीत नाही. त्यासंदर्भात आम्ही काही बोलणार नाही, असं झिरवळ म्हणाले.
आरक्षणावर काय म्हणाले?
आरक्षणाच्या मुद्द्यावरही नरहरी झिरवळ यांनी भाष्य केलंय. आदिवासी समाजाच्या संरक्षणसाठी आज आम्ही सर्व जण एकवटणार आहोत आणि बैठक घेऊन याचा विरोध करणार आहोत. धनगर आणि धनगड हे दोन्ही वेगळे आहेतस असा निर्णय कोर्टाने दिला आहे. यासंदर्भात न्यायालयात लढाई सुरू आहे. आम्ही आज बैठक घेऊन पुढील रणनीती कशी असणार हे ठरवणार आहोत, असं झिरवळांनी म्हटलं आहे.





