ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

अमिताभ बच्चन यांचा संपत्तीबद्दल मोठा खुलासा

एक भाग श्वेता बच्चन हिचा असेल तर दुसरा भाग अभिषेक बच्चनचा एकसमान हक्क

Share On

मुंबई : बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अमिताभ बच्चन, प्रभास आणि दीपिका पादुकोण यांचा कल्कि हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे त्यांचा हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसला. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय दिसतात. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अमिताभ बच्चन दिसतात. काैन बनेगा करोडपतीचे नवीन सीजन होस्ट करताना सध्या अमिताभ बच्चन हे दिसत आहेत. अमिताभ बच्चन काैन बनेगा करोडपतीमध्ये आपल्या खासगी आयुष्याबद्दल कायमच खुलासे करताना दिसतात.

आता अमिताभ बच्चन यांच्याकडून नुकताच त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा करण्यात आलाय. अमिताभ बच्चन यावेळी प्रेक्षकांना आपल्या शाळेतील किस्सा सांगताना दिसले आहेत. अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, शाळेत न जाण्यासाठी ते कशाप्रकारे सर्वांसोबत खोटे बोलायचे. अमिताभ बच्चन यांचे बोलणे ऐकून सर्वजण हैराण झाले.

अमिताभ बच्चन म्हणाले की, जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा मी माझ्या आरोग्याच्या अनेक समस्या सांगत असे. मी खोटे बोलून त्यांना विश्वास द्यायचो की, मी खूप जास्त आजारी आहे. एकदा मी ऐकले होते की, कांदा जवळ ठेवायचा म्हणजे आपल्याला ताप येतो तर मी दररोज कांदा माझ्या जवळ ठेवत असे. शाळेत न जाण्याचा माझा कायमच प्रयत्न असे.

अमिताभ बच्चन म्हणाले की, मी नापास देखील झालोय. नापास झाल्यानंतर मी पुन्हा परीक्षेला बसलो. अथक प्रयत्न आणि सर्वोत्तम कामगिरी केल्याने बीएससीमध्ये 42 टक्के गुण मिळवू शकलो. अमिताभ बच्चन हे काैन बनेगा करोडपतीमध्ये कायमच आपल्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे करताना दिसतात. या सीजनच्या पहिल्या भागाच्या वेळी अमिताभ बच्चन हे भावूक होताना दिसले.

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याकडून त्यांच्या संपत्तीबद्दल अत्यंत मोठा खुलासा करण्यात आलाय. अमिताभ बच्चन यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले की, माझी संपूर्ण संपत्ती ही दोन भागांमध्ये विभागली जाईल. एक भाग श्वेता बच्चन हिचा असेल तर दुसरा भाग अभिषेक बच्चनचा असेल. मी कधीच मुलगा आणि मुलीमध्ये भेदभाव केला नाहीये. यामुळे माझ्या प्रत्येक गोष्टीवर श्वेता आणि अभिषेकचा एकसमान हक्क असणार आहे.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button