breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

यंदाचा गणेशोत्सव शांततापूर्ण आणि पर्यावरणपूरक होणार

पिंपरी : गणेशोत्सवाच्या काळात मंडप परवान्यासाठी ऑनलाईन सुविधा महापालिका व पोलीस प्रशासनाकडून संयुक्तरित्या देण्यात येणार असून यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्यासाठी महापालिकेने तयारी केली आहे. मिरवणूक मार्ग, विसर्जन घाटावरील अतिक्रमणे दूर करण्यात येणार असून रस्त्यांची दुरूस्तीसह आवश्यक सोयीसुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली.

पिंपरी चिंचवड महापालिका आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या नियोजन बैठकीस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, पोलीस उपआयुक्त संदीप डोईफोडे, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता बाबासाहेब गलबले, प्रमोद ओंभासे, उपआयुक्त मनोज लोणकर, संदीप खोत, अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, सहाय्यक आयुक्त मुकेश कोळप, श्रीकांत कोळप, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, उमेश ढाकणे, किशोर ननावरे, सिताराम बहुरे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री. भोसले,  आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, कार्यकारी अभियंता नितीन देशमुख, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह शहरातील गणेश मंडळे, सामाजिक संस्थांचे तसेच पर्यावरणप्रेमी संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा   –    ‘इंदिरा गांधींचं देशासाठीचं योगदान मी नाकारू शकत नाही’; कंगना रणौत

आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध भागात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शहरातील गणेशोत्सव मिरवणूक मार्ग, विसर्जन मार्गांवरील खड्डे तातडीने बुजविण्याबाबत सूचना देण्यात आल्या  आहेत. शहरात इतर विसर्जन हौदांव्यतिरिक्त  ४०x३०x५ फूट आकाराचे प्रत्युएक प्रभागात २ या प्रमाणे १६ ठिकाणी मोठे कृत्रिम विसर्जन हौद उभारण्यात येणार आहेत. तसेच याठिकाणी स्वागत मंडप, मुर्ती स्विकृती केंद्र, विघटन कुंड, मूर्ती स्वीकाराण्याकामी तीन शिफ्टमध्ये मजूर व कर्मचा-यांची नियुक्ती करणे, निर्माल्य कुंड आदी सोयीसुविधा विसर्जन घाटांच्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने देण्यात येणार आहे. तसेच रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविणे, मिरवणूक व विसर्जन मार्गांवरील झाडांच्या फांद्या छाटणे, विसर्जन घाट तसेच मिरवणूक मार्गातील पथदिवे सुस्थितीत ठेवणे, मोकाट जणावरांचा बंदोबस्त करणे, विसर्जनाच्या ठिकाणी कन्व्हेअर बेल्टची व्यवस्था करणे, गणेशोत्सव कालावधीत पूर्ण शहरात स्वच्छतेची मोहीम राबविणे, गणेश मंडळांना परवाने देणे, विसर्जनाच्या ठिकाणी विघटन कुंडांची व्यवस्था करणे, व्हीएमडी सोशल मिडीया अशा विविध माध्यमांद्वारे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत जनजागृती करणे, विसर्जन घाटाच्या ठिकाणी सक्षम वैद्यकीय पथकासह सुसज्ज रुग्णवाहिकेची व्यवस्था करणे, गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आवश्यक विसर्जन स्थळावर तात्पुरत्या स्वरुपात पुरेशी प्रकाश व्यवस्था व ध्वनिक्षेपण व्यवस्था करणे, आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, विसर्जनाच्या ठिकाणी मिरवणूक संपेपर्यंत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, विसर्जनाच्या ठिकाणी जीवरक्षक पथकाची नेमणूक करणे, विसर्जनाच्या ठिकाणी अग्निशमन व्यवस्था करणे तसेच विविध पर्यावरणप्रेमी व सामाजिक संघटनांच्या मदतीने पर्यावरणपूरक, शांततापुर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्याबाबत आवाहन करणे आदी कामे महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहेत.

पोलीस उपआयुक्त संदीप डोईफोडे म्हणाले, पोलीस प्रशासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या मोरया स्पर्धेत शहरातील गणेश मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. हा गणेशोत्सव शांततापुर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस स्टेशन स्तरावर प्रक्रिया सुरू आहे. त्याद्वारे सर्व विभागांशी समन्वय ठेवून पोलीस प्रशासनाद्वारे नियोजन करण्यात येत आहे. उत्सवादरम्यान वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवू नये याची दक्षता घेण्यात येणार आहे. आपल्या मंडपामुळे रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. समाजमाध्यमांवर कोणतेही आक्षेपार्ह मजकूर पाठवू नये किंवा फॉरवर्ड करू नये. अफवांवर विश्वास ठेऊ नये, धार्मिक जातीय भावना दुखावल्या जातील असे कोणतेही कृत्य करू नये. महापालिका, नगरपरिषद यांच्या समन्वयाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे. नागरिकांनी पोलिसांच्या सुचनांचे पालन करावे आणि हा गणेशोत्सव शांततापुर्ण व आनंदी वातावरणात साजरा करावा, असे आवाहनही डोईफोडे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री. भोसले म्हणाले, नागरिकांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांचे निरसन करून, मिरवणूक मार्गांची पाहणी करून नादुरूस्त पथदिवे दुरूस्त करण्यात येतील. तसेच उघडे डिपी बॉक्स बंद करण्यात येतील. मंडळांनी अनधिकृतपणे वीजजोडणी घेऊ नये. महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या परवानगीनंतर मंडळांना वीजजोडणी देण्यात येईल. कोणतीही अडचण असल्यास एमएससीबीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच गणेशभक्तांसाठी विद्युत वितरण व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी २४ तास मदत कक्ष सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नियोजन बैठकीचे प्रास्ताविक उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button