breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सोन्याचे व चांदीचे भाव काय आहेत?

Gold Silver Rate | ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात सोने आणि चांदीला मोठी झेप घेता आलेली नाही. मौल्यवान धातूच्या किंमतीत चढउताराचे सत्र सुरु आहे. गेल्या आठवड्यापासून महागाईकडे आगेकूच करण्याचा दोन्ही धातूचा प्रयत्न फसला आहे. गेल्या आठवड्यात एकच दिवस दरवाढ झाली होती. या आठवड्यात पण दोन्ही धातूंना कमाल दाखवता आली नाही. मौल्यवान धातूत दरवाढ आणि घसरणीचे सत्र सुरु आहे.

ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात सोने आणि चांदीचे भाव स्थिर आहेत. अशातच आज २२ कॅरेट सोने ६७,३०० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ७३,४०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. दोन आठवड्यापासून चांदीला दरवाढीचा आलेख उंचावता आलेला नाही. गेअशातच आज एक किलो चांदीचा भाव ८८,४०० रुपये आहे.

हेही वाचा   –    देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून अपयशी, त्यांना लाज वाटली पाहिजे; संजय राऊतांचा हल्लाबोल!

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) २४ कॅरेट सोने ७१,६९१, २३ कॅरेट ७१,४०४, २२ कॅरेट सोने ६५,६६९ रुपयांवर घसरले. १८ कॅरेट आता ५३,७६८ रुपये, १४ कॅरेट सोने ४१,९३९ रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव ८४,९२९ रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button