breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सोमवती यात्रेच्या पार्श्वभूमीवर जेजुरी परिसरातील वाहतुकीत बदल

पुणे : पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे सोमवारी (दि. 2 सप्टेंबर) श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून 2 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत पुणे जेजुरी-बारामती महामार्गावरील जड, अवजड व इतर वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

हेही वाचा    –    आम्ही लाडकी बहीण योजना थांबवली पाहिजे का? सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला पुन्हा झापलं 

जेजुरी पोलीस ठाणे हद्दीत सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी-सासवडकडे येणारी जड, अवजड व इतर वाहतूक पूर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने नीरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गाने पुणे अशी वळविण्यात येत आहे. जेजुरी बेलसर फाटा मार्गावर पुण्याकडून बारामतीकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद करुन बेलसर-कोथळे-नाझरे-सुपे-मोरगाव मार्गे बारामती, फलटण व साताराकडे जातील.

सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बारामती व नीरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करुन ती मोरगाव-सुपा-केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गाने पुण्याकडे वळविण्यात येत आहे.

सासवड पोलीस ठाण्याअंतर्गत पुणे बाजूकडून जेजुरी मार्गे फलटण-सातारा बाजूकडे जाणारी जड, अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करुन सासवड- नारायणपुर-कापुरहोळ मार्गे सातारा-फलटण किंवा सासवड-वीर फाटा-परिंचे-वीर-वाठार कॉलनी मार्गे लोणंद अशी वळविण्यात येत आहे.

वाहतुकीस लावलेले निर्बंध 2 सप्टेंबर रोजीच्या ‘श्री खंडोबा देवाची सोमवती यात्रेकरिता येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी शिथील राहतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button