breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पालिका शाळांमध्ये पहिल्यांदाच इको-फ्रेंडली गणेशमूर्ती स्पर्धा

पिंपरी : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत आजच्या तरुण पिढीला प्रबोधन व्हावे, याकरिता पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत यंदा पहिल्यांदाच पालिका शाळांमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्ती ही पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती व सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पारंपरिक पद्धतींकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेतर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

गणेशोत्सवामधील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण यासाठी गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा होणे ही काळाची गरज आहे. यासाठी प्रत्येकाने आपला दृष्टिकोन पर्यावरणस्नेही ठेवला तरच उत्सव साजरे करण्याबाबत सामाजिक परिवर्तन होऊ शकेल,या उद्देशाने इयत्ता 5 वी ते 10 वी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शालेय स्तरावर इको-फ्रेंडली गणेशमूर्ती स्पर्धा घेण्यात येत आहे.

हेही वाचा    –    आम्ही लाडकी बहीण योजना थांबवली पाहिजे का? सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला पुन्हा झापलं 

विद्यार्थ्यांना शाश्वत, नैसर्गिकरित्याविघटन होणार्‍या वस्तू किंवा पुनर्वापरातील साहित्य वापरून गणपतीच्या मूर्ती आणि उत्सवाच्या सजावटीमध्ये सहभाग घेता येणार आहे. गणेशमूर्ती तयार करणे व सजावट या दोन प्रकारांमध्ये स्पर्धा होईल.त्यात माती, कागद आणि नैसर्गिक तंतू यांसारख्या नैसर्गिक साहित्याचा वापर करून गणपतीच्या मूर्ती तयार करणे आवश्यक आहे.सजावट या प्रकारात पुर्नवापरातील साहित्य, नैसर्गिक घटक आणि जैवविघटनशील पदार्थांसह उत्सवाची सजावट आवश्यक आहे.

स्पर्धेतील व्यापक सहभाग आणि पर्यावरणपूरक पद्धतींचे पालन करण्यासाठी प्रत्येक सहभागी शाळेत एक इको- क्लब तयार करण्यात येणार आहे.यामध्ये प्रत्येक वर्गात दोन विद्यार्थी हे पर्यावरणपूरक पद्धतींबद्दल जनजागृती करण्यासह मोहीम आणि स्पर्धा यांच्यात समन्वय साधतील. आरोग्य विभागामार्फत हा उपक्रम राबविण्यात येत असून याबाबत अर्जाची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे.

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणपतीच्या मूर्ती व सजावट 3 ते 5 सप्टेंबर 2024 या कालावधीत प्रदर्शनासाठी ठेवण्यात येतील. कला शिक्षक, पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिक यांचे एक पॅनेल पर्यावरणास अनुकूल तत्त्वांचे पालन आणि एकूण परिणाम यावर परिक्षण करून इको फ्रेंडली मूर्तीचे मूल्यांकन करतील.अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव सुध्दा पर्यावरणपूरकच असायला हवा, यासाठी पर्यावरणाची काळजी घेऊन विद्यार्थ्यांसाठी बालपणापासूनच पर्यावरणपूरक सराव करण्याची ही एक अनोखी संधी आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button