पुण्यात तरूणीची हत्या, मृतदेहाचे तुकडे करुन धड नदीपात्रात फेकलं
पुणे | पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. खराडी भागात मुळा, मूठा नदी पात्रात एका तरुणीचा मृतदेह सापडला आहे. शिरच्छेद झालेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळला. अत्यंत क्रूर पद्धतीने ही हत्या करण्यात आली. तरुणीच डोकं, हात-पाय धडापासून वेगळे करण्यात आले होते. मृत तरुणी १८ ते २० वयोगटातील आहे. हत्येच कारण अद्याप अस्पष्ट आहेत. पोलिसांनी अज्ज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खराडी परिसरात जेनी लाईट कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहे. येथून जवळच असलेल्या नदीपात्रात एका महिलेचे हात पाय आणि डोके नसलेल्या अवस्थेत धाड असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. मयत तरुणीची ओळख अद्याप पटली नाही. या तरुणीचे वय अंदाजे १८ ते ३० इतके आहे.
हेही वाचा – क्रीडा विश्व : मातृ विद्यालयाने सेंट उर्सुला हायस्कूलवर दणदणीत विजय
अज्ञात इसमाने ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे धडापासूनचे शीर, दोन्ही हात खांद्यापासून, दोन्ही पाय खुब्यापासून धारदार शस्त्राच्या साह्याने कापून टाकले. त्यानंतर हे धड मुळा-मुठा नदीपात्रात टाकून दिले. अज्ञात व्यक्ती वरोधात त्याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.