breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमनोरंजनराजकारण

‘शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या’; कंगना रनौत यांचं वादग्रस्त विधान

Kangana Ranaut | भाजप खासदार तथा अभिनेत्री कंगना रनौत या नेहमीच त्यांच्या विधानामुळे चर्चेत असतात. याआधी त्यांनी शेतकरी आंदोलनावर एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शेतकरी आंदोलनात अनेक हत्या अन् बलात्कार झाल्याचा आरोप कंगनाने केला आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

कंगना रनौत म्हणाली, शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली जे काही चालू होते, ते संपूर्ण देशाने बिघतले आहे. निषेधाच्या नावाखाली हिंसाचार पसरवला गेला. बरं झालं केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले. अन्यथा तिथे मोठं षडयंत्र रचलं जात होतं. ते लोक काहीही करू शकले असते.

हेही वाचा    –      आयुष्याच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान मोलाचे; भाऊसाहेब भोईर

शेतकरी आंदोलनावेळी देशाचे नेतृत्व मजबूत नसतं, तर या लोकांनी पंजाबमध्ये बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण केली असती. त्यासाठी मोठी योजना तयार होती. शेतकरी आंदोलनाच्या नावावर जे काही सुरु होत होतं, ते सर्वांनी बघितली आहे. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आंदोलकांना धक्का बसला होता, असं कंगना म्हणाली.

कोलकातातील महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणावरही कंगनाने भाष्य केलं. महिला सुरक्षा हा माझ्यासाठी नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. या मुद्द्यावर मी खूप गंभीर आहे. मी अनेकदा महिलांच्या न्याय हक्कांसाठी आवाज उठवला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button