breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारण

‘सरकारं येतील आणि जातील…’; महिला अत्याचारावर मोदींचं कडक शब्दात भाष्य

PM Narendra Modi : गेल्या काही दिवसांपासून देशभरात महिला अत्याचारांवर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील बदलापुरात दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्याविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणावरुन विरोधकांनी आक्रमक पावित्रा घेतला. आता महिला अत्याचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार महिलांच्या सोबत आहे. राज्याच्या सोबत आहे. अत्याचार करणारी मानसिकता आपल्याला दूर करायची आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज जळगावात ‘लखपती दीदीं’चा मेळावा पार पडला. या कार्यक्रमाला एक ते दीड लाख बचत गटाच्या महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील स्त्रियांचा गौरव केला. तसेच महिला अत्याचारांच्या वाढत्या गुन्ह्यांबद्दलही भाष्य केले. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर शिक्षा देण्यासाठी आमचं सरकार कायदा कडक करत आहे, असेही मोदींनी म्हटले.

“महिलांवरील होणारे अत्याचार अक्षम्य पाप आहे. दोषी कोणीही असेल त्याला सोडू नका, त्याला कोणत्याही प्रकारे मदत करणारे वाचले नाही पाहिजे. रुग्णालय, शाळा, पोलीस व्यवस्था, कोणत्याही ठिकाणी निष्काळजीपणा होत असेल तर हिशोब करा. वरपर्यंत मेसेज जाऊ द्या. हे पाप अक्षम्य आहे. सरकार येईल जाईल,. पण जीवनाची रक्षा, नारीची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. सर्व राज्य सरकारांना सांगतो, आणि राजकीय पक्षांना सांगतो”, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

हेही वाचा –  लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीसांनी दिली अपडेट

“महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर शिक्षा देण्यासाठी आमचं सरकार कायदा कडक करत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने महिला आल्या आहेत. आधी तक्रार येत होती, वेळेत एफआयआर होत नाही. सुनावणी होत नाही. खटला उशीरा सुरू होतो. निर्णय उशिरा येतो. या अडचणी भारतीय न्याय संहितेतून दूर केला आहे. एक चॅप्टर महिला आणि बाल अत्याचाराचा आहे. पीडित महिलांना पोलीस ठाण्यात जायचं नसेल तर ई एफआयआर करू शकते. ई एफआयआरमध्ये कोणी छेडछाड करणार नाही याचीही व्यवस्था केली आहे. त्यामुळे चौकशी चांगली होईल आणि दोषींवर शिक्षा करण्यास मदत होईल”, असे नरेंद्र मोदींनी म्हटले.

“नव्या कायद्यात अल्पवयीन मुलींवरील लैंगिक शोषणावर फाशी आणि जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद केली आहे. लग्नाच्या नावाने मुलींची फसवणूक केली जायची. त्यावर शिक्षा होत नव्हती. आता यावर आम्ही कायदे केले आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार महिलांच्या सोबत आहे. राज्याच्या सोबत आहे. अत्याचार करणारी मानसिकता आपल्याला दूर करायची आहे”, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

“भारत विकसित होत आहे. त्यात महाराष्ट्राची मोठी भूमिका आहे. महााराष्ट्र विकसित भारताचा चमकता तारा आहे. गुंतवणूकदारांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. महाराष्ट्राचं भवितव्य सर्वाधिक गुंतवणुकीत आहे. महायुतीचं सरकार म्हणजे गुंतवणूक आणि नोकरीची गॅरंटी आहे”, असेही नरेंद्र मोदींनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button