breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पवना धरणातून ३५०० क्युसेक विसर्ग सुरू

पिंपरी : मावळ तालुक्यातील प्रमुख पवना धरण हे 100 टक्के इतके भरले आहे. त्‍यामुळे शहरवासियांची वर्षभराची पाण्‍याची चिंता मिटली आहे. धरण पाणलोट क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्‍यामुळे धरणातून ३५०० क्‍युसेस पाण्‍याचा विसर्ग सुरू केला आहे.

हेही वाचा     –      पुण्याचं दाम्पत्य २५ किलो सोनं घालून तिरुपती दर्शनाला! Video व्हायरल.. 

पवना धरण सद्यस्थितीत १०० टक्के भरलेले असून पाणलोट क्षेत्रात पावसास सुरुवात झालेली आहे. धरणात येणारा येवा विचारात घेता धरणातील पाणीसाठा नियंत्रित करणेकरिता जलविद्युत केंद्रामधून विदुयतगृहाद्वारे 1400 क्युसेक्स इतक्या क्षमतेने नदीपात्रात विसर्ग सुरू असून त्‍यामध्‍ये दुपारी दोन वाजल्‍यापासून आणखी वाढ करण्‍यात आला असून सध्‍या ३५०० क्‍युसेस पाण्‍याचा विसर्ग सुरू केला आहे. नागरीकांनी नदी पात्रात उतरू नये. नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. सखल भागातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्‍यावी, असे आवाहन पवना धरण पूरनियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button