breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या वतीने ३३ युवांना प्रशिक्षणार्थी नियुक्तीपत्र प्रदान

पिंपरी : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते ३३ युवांना नियुक्ती प्रमाणपत्र देऊन या योजनेची प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.

राज्य शासनाच्या वतीने राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळविण्याची तसेच उद्यमशीलता क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” सुरु करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागाकडील कामकाजासाठी शेखर सिंह यांच्या हस्ते ३३ युवांना प्रशिक्षणार्थी नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आले. हा कार्यकम महापलिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात संपन्न झाला.

यावेळी शहर अभियंता मकरंद निकम, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील, उप आयुक्त विठ्ठल जोशी, विशेष अधिकारी किरण गायकवाड, समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे, कार्यकारी अभियंता नितीन देशमुख, माहिती तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार, प्रशासन अधिकारी गोरखनाथ लिमन, समाज सेवक संतोषी चोरघे, नम्रता रणसिंग, विशाल शेडगे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी, युवा प्रशिक्षणार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते.

हेही वाचा     –        बदलापूरमध्ये घडलेली घटना अत्यंत धक्कादायक! शरद पवार 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील एकूण पदसंख्येच्या ५ टक्के जागा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत तात्पुरत्या कालावधीसाठी भरण्यात येत आहेत. त्यानुषंगाने महापालिकेच्या विविध विभागकडील मागणीनुसार एकूण ५७५ जागांवर युवा प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये फिल्ड सर्वे एन्युमरेटर, माळी, मल्टी टास्किंग स्टाफ, स्थापत्य अभियंता, आरोग्य विषयक कामकाज, वायरमन, संगणकीय कामकाज, प्रशासकीय कामकाज, कार्यालयीन कामकाज अशा विविध कामकाजाचे अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. आज फिल्ड सर्वे एन्युमरेटर या कामकाजासाठी ३३ युवांना नियुक्ती देण्यात आली.

यामध्ये नागिनी तेलंग, विशाल मोरे, स्वप्नील अवारे, आकाश पोतदार, मानसी बिराजदार, ऋतुजा बोंबले, शितल चव्हाण, निरंजन थोरात, सतीश भोसले, संदेश खंदारे, धार्मिक पटेल, सचिन चिकणे, मयुर रंगारी, अनिरूद्ध आवाळे, आकांक्षा नवरत्ने यांना प्रातिनिधीक स्वरूपात आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

तसेच येत्या सोमवार, २६ ऑगस्ट २०२४ रोजी मोरवाडी येथील दिव्यांग भवन येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, पुणे यांच्या सहकार्याने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात महापालिकेचे विविध विभाग सहभागी होऊन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत युवकांना प्रशिक्षण घेण्याची संधी  उपलब्ध करून देणार आहेत. मोठ्या संख्यने युवक आणि युवतींनी या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button