ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

ठाकरे गटात उमेदवारीवरून धुसफूस

शिवडी विधानसभेत घडणार “इतिहास”… शिवसेनेचा भगवा पुन्हा फडकवणार

मुंबई : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने एक डाव धोबीपछाड केला होता. पण आता विधानसभेसाठीची समीकरणं बदलली आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वीच शिवडी विधानसभा मतदारसंघात वातावरण तापले आहे. शिवडी मतदारसंघात ठाकरे गटात उमेदवारीवरुन खदखद असल्याचे समोर येत आहे. विद्यमान आमदार अजय चौधरी यांनी आतापर्यंत दोनदा शिवडी मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. ते आता तिसऱ्यांदा हॅटट्रीक करण्याच्या तयारीत आहे. पण उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याने बंडाचा गुलीगत धोका कुणाला बसणार आणि महायुतीचा या मतदारसंघातील विजयाचा मार्ग सुकर होणार का? ही चर्चा रंगली आहे.

 एक पदाधिकारी अजून इच्छुक

शिवडी विधानसभेमध्ये सध्याचे आमदार अजय चौधरी यांच्या सोबत आणखी पदाधिकारी विधानसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये लालबागच्या राजाचे मानद सचिव सुधीर साळवी यांचे नाव पुढे आहे. अजय चौधरी आणि सुधीर साळवी या दोन्ही उमेदवारांचे पोस्टर शिवडीमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत. आमदार अजय चौधरी यांच्या समर्थकांकडून चौधरी यांचे पोस्टर व्हायरल केल्याने सुधीर साळवी यांच्या समर्थकांनी पोस्टर व्हायरल केल्याचे समोर येत आहे.

शिवडी विधानसभेत घडणार “इतिहास”… शिवसेनेचा भगवा पुन्हा फडकवणार चौधरी साहेब हॅट्रिक मारणार असं पोस्टर सोशल शिवडीमध्ये मीडियावर व्हायरल केल होतं. तर बदल हवा आमदार नवा… शिवडी विधानसभेत एकच पुकार आता हवा शिवसेना पक्षाचा युवा आमदार असं आशयाचे पोस्टर सुधीर साळवी यांच्या समर्थकांकडून वायरल करण्यात आलं आहे.या दोन्ही पोस्टरमुळे आगामी विधानसभेत ठाकरे गटाकडून कोणाला उमेदवारी मिळणार यावरून संघर्ष सुरु झाला आहे. विधानसभा जवळ येत असताना दोन्ही उमेदवारांमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेंच दिसून येत आहे. गेले दोन टर्म अजय चौधरी शिवडी विधानसभेचे आमदार आहेत, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर गटनेते पदाची जबाबदारी पण अजय चौधरी यांच्यावर देण्यात आली होती.

बाळा नांदगावकर पण मैदानात

सुधीर साळवी हे लालबागच्या राजाचे मानद सचिव आहेत. गेली 10 वर्ष शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा समन्वयक आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई लोकसभा समन्वयक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. दुसरीकडे मनसेकडून बाळा नांदगावकर यांची शिवडी विधानसभेसाठी उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटातील उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महायुती भाकर फिरवणार?

महाविकास आघाडीने दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला. या भागातील वर्चस्व ठाकरे गटाने दाखवून दिले. पण शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ असलेल्या शिवडी विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घटल्याची चिंता पण ठाकरे गटाला सतावत आहे. अशात उमेदवारीवरुन होणारी धुसफूस वेळीच रोखली नाही तर महायुती भाकर फिरवणार तर नाही ना? अशी चर्चा होत आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button