ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘महाराष्ट्र बंद’ हा उद्दाम सत्ताधाऱ्यांना ताळ्यावर आणण्यासाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी : आदित्य ठाकरे

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या येवला आणि मनमाडमध्ये जाहीर सभा

नाशिक : नाशिक दौऱ्यावर असलेले शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या आज येवला आणि मनमाडमध्ये जाहीर सभा झाल्या. या सभेत आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप-मिंधे सरकारवर हल्लाबोल केला. महाराष्ट्राला सुवर्णकाळाकडे नेण्यासाठी आपल्याला एकत्र येऊन, एकजुटीने लढावं लागेल. भाजप-मिंधे सरकारला ह्या महाराष्ट्रातून हद्दपार करत नाही तोपर्यंत आपली लढाई संपणार नाही, ह्याचा पुनरुच्चार आज येवला येथे झालेल्या ‘महाराष्ट्र स्वाभिमान सभेत’ आदित्य ठाकरे यांनी केला. 24 ऑगस्ट रोजी होणारा ‘महाराष्ट्र बंद’ हा उद्दाम सत्ताधाऱ्यांना ताळ्यावर आणण्यासाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी असून त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिक आणि जनतेला केले.

शेतकऱ्यांना मदत द्या, ही मागणी आपण सतत करत होतो. इथे तर बघायला तयार नाहीत. पण आता नवीन कुठेतरी गाणं गाताहेत लाडकी बहीण… लाडकी बहीण. इथे अनेक महिला आलेल्या आहेत. कदाचित आपल्या खात्यात आणखी दीड हजार रुपये टाकतील. आणखी एखादा हप्ता देतील. आम्ही सरकार आल्यानंतर हा निधी वाढवून, असे घटनाबाह्य मुख्यमंत्री आज सांगत आहेत. जे 2014 मध्ये 15 लाखांबद्दल बोलत होते. पंतप्रधान बोलले होते 15 लाख रुपये सर्वांच्या खात्यात देऊ. ते 10 वर्षांनंतर आता 15 लाखांवरून 1500 वर आलेले आहेत, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. 15 लाख बोलणारे आता 1500 आले आहेत. पंधराशेसाठीही अटी शर्ती एवढ्या टाकलेल्या आहेत अर्ध्या महिला त्यात येणार नाहीत. अजून काही अटी-शर्ती वाढवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे जेवढ्या महिला निवडणुकीपर्यंत येतील. निवडणुकीनंतर हे खोके सरकार तुम्हाला आणखी कमी करण्याचा प्रयत्न करेल. आता सांगताहेत वाढीव पैसे देऊ. पण नंतर पैसेच नाही, असे सांगतील. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे सांगतो. तुमचं सरकार तर येतच नाही. हिंमत असेल तर आत्ताच वाढीव रक्कम द्या, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी भाजप-मिंधे सरकारला दिले.

ज्या घटना महाराष्ट्र घडताहेत त्या आपण पाहतोय. बदलापूरमध्ये, नाशिकच्या सिन्नरमध्ये, साताऱ्यातही अशी घटना घडली आहे. बदलापूरची घटना ही एवढी दुर्दैवी आणि विचित्र घटना आहे. त्या बलात्कारी आणि अत्याचाऱ्याला महिलांमध्ये सोडून द्या. महिलांनाच त्याचा न्यायनिवडा लावू द्या, मग जनता ठरवेल कोण बरोबर आणि कोण चुकीचं आहे. एक आठवडा निघून गेला. तीन आणि चार वर्षांच्या मुलींवर ज्या शाळेत अत्याचार झाले ती शाळा भाजपच्या एका व्यक्तीची होती. एक आपटे नावाच्या व्यक्ती होता. म्हणून त्या शाळेला वाचवण्यासाठी एफआयआरची नोंद घेऊ नका यासाठी पोलीस स्टेशनवर दबाव होता. मग हा तुमचा लाडका भाऊ असू शकतो का? जाहीर निषेध काय कितीही निषेध केला तरी कमीच आहे, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारच्या भ्रष्ट आणि भोंगळ कारभारावरून जोरदार हल्ला  केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button