ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुजरातमध्ये ‘चांदीपुरा व्हायरस’चा कहर, व्हायरसमुळे २८ मुलांचा मृत्यू

आरोग्यमंत्री हृषिकेश पटेल यांनी याबाबत सभागृहात माहिती दिली

गुजरात : जगात वेगवेगळ्या व्हायरसचा कहर सुरुच आहे. कोरोनाचे वेगवेगळे व्हेरिएंटने कहर केल्यानंतर आता आफ्रिकन देशांमध्ये मंकीपॉक्सचा कहर पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर हा व्हायरस शेजारील देश पाकिस्तानपर्यंत पोहोचला आहे. असं असतानाच गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा कहर पाहायला मिळत आहे. कारण येथे एका महिन्यात या व्हायरसमुळे २८ मुलांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्री हृषिकेश पटेल यांनी सदनात माहिती देताना सांगितले की, गुजरातमध्ये आतापर्यंत व्हायरल एन्सेफलायटीसची 164 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यामध्ये 101 मुलांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत आढळलेल्या या 164 प्रकरणांपैकी 61 चांदीपुरा विषाणूमुळे आहेत.

चांदीपुरा व्हायरसची लक्षणे कोणती?
चांदीपुरा विषाणूची लक्षणे फ्लूसारखी असतात. यात एन्सेफलायटीस (मेंदूची जळजळ) कारणीभूत असतात. त्याचा प्रसार डास आणि माश्यांद्वारे होतो. पटेल म्हणाले, ‘आतापर्यंत 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 101 मुलांचा तीव्र एन्सेफलायटीसमुळे मृत्यू झाला आहे. त्यापैकी 28 जणांचा मृत्यू चांदीपुरा विषाणूच्या संसर्गामुळे झाला आहे, तर इतर 73 जणांचा मृत्यू व्हायरल इन्फेक्शनमुळे होणाऱ्या एन्सेफलायटीसमुळे झाला आहे.

63 मुलांना उपचारानंतर घरी सोडले
मंत्री म्हणाले की, 63 मुलांना उपचारानंतर सोडण्यात आले, तर चार जणांवर अजूनही वैद्यकीय उपचार सुरु आहेत. परिस्थिती नियंत्रणात आहे आणि गेल्या एका आठवड्यात एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. गेल्या 12 दिवसांत एकही मृत्यू झालेला नाही. मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने चांदीपुरा विषाणूच्या वेक्टर नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी राज्यभर मोहीम सुरू केली आहे.

या मोहिमेअंतर्गत, आरोग्य पथकांनी ज्या भागात विषाणूजन्य एन्सेफलायटीस आणि चांदीपुराची प्रकरणे आढळून आली त्या भागातील 53,000 हून अधिक घरांचे सर्वेक्षण केले. ते म्हणाले की, रोगाच्या नियंत्रणासाठी गावातील 7 लाखांहून अधिक मातीच्या घरांमध्ये कीटकनाशक मॅलेथिऑन पावडरची फवारणी करण्यात आली आहे. ते म्हणाले की सुमारे 1.58 लाख घरांमध्ये द्रव कीटकनाशकाची फवारणी करण्यात आली आहे.

बाधित जिल्ह्यांतील सुमारे 40,000 शाळा आणि 36,000 हून अधिक अंगणवाड्यांमध्ये मॅलेथिऑन पावडर आणि द्रव कीटकनाशकाची फवारणी करण्यात आली. पटेल म्हणाले की, गांधीनगर स्थित गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर (GBRC) चांदीपुरा व्यतिरिक्त इतर विषाणू ओळखण्यासाठी संशोधन करत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button