breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विद्यार्थ्यांची प्रगती पाहून शिक्षकांना समाधान मिळते; अनिल जाधव

छत्रपती श्री शिवाजी महाराज विद्यालयाचा माजी विद्यार्थी मेळावा

भोसरी | प्रतिनिधी

शिक्षकांना कोणत्याही पारितोषिकाची गरज नसते. मुलांनी घडावं, यासाठी शिक्षक रागवतो. वेळप्रसंगी त्यांना मारतो. परंतु, विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या क्षेत्रातील झालेली प्रगती पाहून शाळा आणि शाळेतील प्रत्येक शिक्षकाला ख-या अर्थाने समाधान मिळते, असे मत महापालिकेचे माजी शिक्षक अनिल जाधव यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरीतील छत्रपती श्री शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाचा 2007-08 शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रविवारी (दि.18) पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. शाळेचे शिक्षक रामचंद्र देशमुख, सुधीर कुलकर्णी, शोभा कोरडे, मालती वाणी, प्रतिमा थोरात, सुरवसे सर आदी उपस्थित होते.

रामचद्र देशमुख म्हणाले, शिक्षकांविषयी आज आदरयुक्त भिती राहिेलेली नाही. शिक्षक, माता-पिता, समाजाविषयी आदर प्रत्येकाच्या घरात निर्माण व्हावा. त्यासाठी आपल्या मुलांना शिकवण द्यावी.

हेही वाचा     –      धक्कादायक : पिंपरी मतदारसंघात दुबार ओळखपत्रांसह सात हजार नावे! 

मालती वाणी म्हणाल्या, शाळा संपल्यानंतर 16 वर्षे उलटली. या निमित्ताने तुम्ही सगळे एकत्र आलात. तसे सातत्याने भेटा. अडचणी सर्वांना असतात. त्यातून मार्ग काढत रहा आणि पुढे जा.

सुधीर कुलकर्णी, प्रतिमा थोरात, शोभा कोरडे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले. उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी मनोगतातून शाळेतील आठवणींना उजाळा दिला. जान्हवी जगताप या चिमुकलीने नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. माजी विद्यार्थी व विद्यार्थींनी कविता सादरीकरम व गायन केले.

अजिक्य माने, प्रकाश लोखंडे, भुषण बिड्ये, ऋषिकेश शितोळे, संदीप साकोरे, गणेश सोनवणे यांनी संयोजन केले. योगेश नाळे यांनी सूत्रसंचालन केले. दत्ता ठाकरे यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button