breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Pimpri Chinchwad | इंद्रायणी नदीत दोघांचा बुडून मृत्यू, अग्निशमन विभागाकडून शोधमोहीम सुरू

पिंपरी | पिंपरी चिंचवडमधील मोशी परिसरात इंद्रायणी नदीत दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना सोमवारी (दि.19 ऑगस्ट) सकाळी उघडकीस आली.

अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी येथील तापकीर वस्ती येथे इंद्रायणी नदीत दोन मुले बुडाल्याची माहिती सोमवारी सकाळी अग्निशमन विभागाला मिळाली. त्यानुसार दोन पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. अग्निशमन दलाचे जवान बोटीच्या सहाय्याने दोन्ही मुलांचा शोध घेत आहेत.

श्रावण पूजननिमित्त नदी पूजनासाठी हे सर्व विद्यार्थी इंद्रायणी नदीच्या डूडूळगाव येथील नदीकाठावर गेले होते. यावेळी नदीत उतरलेल्या विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी वाहत जाऊ लागल्याने त्यांना वाचवण्यासाठी दुसऱ्या विद्यार्थ्यांने नदीत उडी घेतली; मात्र त्याला एकाला वाचविण्यात यश आले पण तो स्वतःच यात बुडाला. हे विद्यार्थी घाबरलेले असून निश्चित किती जण बुडाले याचा आकडा सांगता येत नसून अंदाजे दोन विद्यार्थी बुडाल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा   –    बारामतीतून लढण्यास मला रस नाही; अजित पवारांच्या विधानावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले.. 

महानगरपालिकेचे उपआयुक्त मनोज लोणकर म्हणाले, वेदश्री तपोवन आश्रमातील काही मुले आज सकाळी 8.30 च्या सुमारास नदीवर आली होती. एक मुलगा नदीत घसरला. त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या इतर मुलांनी नदीत पडण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचवले एकूण तीन मुले बुडाली, दोन बेपत्ता आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button