breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

बारामतीतून लढण्यास मला रस नाही; अजित पवारांच्या विधानावर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले..

पुणे | बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास कोणताही रस नाही, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्या मनात नक्की काय आहे? मला माहिती नाही, असं शरद पवार म्हणाले. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शरद पवार म्हणाले, लाडकी बहीण योजनेमुळे निवडणुका पुढे ढकलल्या का हे मला माहिती नाही. निवडणूक आयोगाला हा प्रश्न विचारायला हवा. आम्ही त्याबाबत काय बोलणार? १५ ऑगस्टला पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून जे भाषण केलं त्यात वन नेशन, वन इलेक्शन ही संकल्पना त्यांनी मांडली. याचा अर्थ एकाच वेळी सगळ्या निवडणुका व्हाव्यात याचा आग्रह पंतप्रधानांचा होता. दुसऱ्याच दिवशी तीन राज्यांच्या वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्या गेल्या. याचा अर्थ पंतप्रधानांच्या म्हणण्याला आता फारसं काही महत्त्व द्यायचं कारण नाही. कारण पंतप्रधान बोलतात एक आणि निर्णय दुसराच होतो याची प्रचिती आपल्याला आली.

हेही वाचा    –      छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर, विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित! 

बारामतीमधून निवडणूक लढवण्यात आता रस नसल्याचं अजित पवार म्हणाले. त्याबाबत शरद पवारांना विचारणा केली असता त्यावर त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. सार्वजनिक जीवनात किंवा राजकीय जीवनात निवडणुका लढवलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार असतो. जिथे अनुकूल वातावरण असतं, तिथे त्याप्रमाणे निर्णय घेतले जातात. पण आता यांचा (अजित पवार) मनात नक्की काय आहे, हे मला माहिती नाही, असं शरद पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button