क्रिडाताज्या घडामोडीमुंबई

महिला कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिक २०२४ नंतर मायदेशी परतली

भारतात परतल्यानंतर तिच्या भावना अनावर, भारतात जल्लोषात स्वागत

मुंबई : भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिक २०२४ नंतर शनिवारी मायदेशी परतली. तिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या फ्रिस्टाईल ५० किलो वजनी गटात खेळताना अंतिम फेरीत धडक मारली होती. परंतु, अंतिम फेरीपूर्वी तिचं वजन १०० ग्रॅमने अधिक भरल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. तिने यासाठी क्रीडा लवादाकडे दादही मागितली होती. परंतु, तिची याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर आता ती भारतात परतली आहे. भारतात परतल्यानंतर तिला भावनाही अनावर झाल्या होत्या. तिचे भारतात जल्लोषात स्वागत झाले. हे स्वागत पाहून तिचे डोळे पाणावले होते. यावेळी तिने असंही सांगितलं की ‘सर्व देशवासियांचे आभार, मी खरंच भाग्यशाली आहे.

तसेच नंतर ती तिच्या गावी बदलीला पोहचल्यानंतर म्हणाली, ‘जरी मला सुवर्णपदक नाकारण्यात आलं असलं तरी लोकांनी मला दिलं आहे. मला जे प्रेम आणि सन्मामन मिळाला, तो १००० सुवर्णपदकांपेक्षा मोलाचा आहे. विनेशने तिच्या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तीन बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. ती अंतिम फेरीत पोहचणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. मात्र अंतिम सामन्याच्या दिवशी तिचं वजन १०० ग्रॅमने अधिक भरलं. त्यामुळे नियमानुसार ऑलिम्पिक समितीने तिला अपात्र ठरवत सर्वात शेवटच्या स्थानावर ठेवलं होते. या निर्णयाविरोधातील तिची याचिकाही फेटाळण्यात आली.

परंतु, असं असतानाही भारतीयांनी तिच्या कामगिरीबाबत आदर दाखवला आणि तिने केलेल्या कामगिरीचे कौतुक केले आहे. त्यामुळे तिचे स्वागतही जोरदार झाले. तिच्या स्वागतासाठी ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि बॉक्सर विजेंदर सिंगही उपस्थित होते. तथापि, लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की विनेशने घडलेल्या सर्व प्रकारानंतर कुस्तीमधून निवृत्ती घेतली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button