Breaking-newsमनोरंजन
नाना पाटेकर यांना महिला आयोगाची नोटीस ; पोलिसांकडूनही मागितला अहवाल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/tanushree-vs-nan.jpeg)
मुंबई– बॉलीवूडमध्ये सध्या तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांचे प्रकरण खूप गाजत आहे. तनुश्री दत्ताने २००८ साली एका चित्रपटाच्या वेळी आयटम सॉंग शूट केले जात असताना नाना पाटेकर यांनी आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केले असल्याचे आरोप केले आहेत.
दरम्यान, तनुश्री दत्ता हिने गैरवर्तनाचे आरोप केल्यानंतर महिला आयोगाने अभिनेते नाना पाटेकर यांना नोटीस बजावली. तसेच गणेश आचार्य, समीर सिद्दीकी आणि दिग्दर्शक राकेश सारंग यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. महिला आयोगाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून सर्वना १० दिवसात आपले म्हणणे मांडण्याचे सांगितले. तसेच महिला आयोगाने पोलिसांकडूनही याप्रकरणावर करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल मागितला आहे.