breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

‘विनेश फोगट प्रकरणात स्वतः खेळाडू व प्रशिक्षक जबाबदार’; पीटी उषा यांचे विधान

Vinesh Phogat | विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधून महिलांच्या ५० किलो फ्रीस्टाइल फायनलमध्ये जास्त वजन आढळल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. या प्रकरणावर विनेश फोगटने आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादामध्ये याचिका सादर केली होती. सध्या CAS मध्ये यावर सुनावणी सुरू असून त्यावर १३ ऑगस्ट रोजी निकाल दिला जाणार आहे. या वादावर भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी एक मोठं विधान केलं आहे.

पीटी उषा म्हणाल्या, कुस्ती, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, ज्युडो यांसारख्या खेळांमध्ये खेळाडूंच्या वजन व्यवस्थापनाची जबाबदारी प्रत्येक खेळाडू आणि त्याच्या प्रशिक्षकावर असते. आयओएचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनशॉ पारडीवाला आणि त्यांच्या टीमवर नाही. आयओए वैद्यकीय संघ, विशेषत: डॉ. पारडीवाला यांच्यावरील टीका अस्वीकार्य आणि निषेध करण्याजोगी आहे. त्यांना आशा आहे की लोक कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी सर्व बाजूंनी विचार करतील.

हेही वाचा    –        ‘घरात जेवण करायला सांगा तेही करू, पण मतदान महायुतीला करा’; हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत 

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक भारतीय खेळाडूला अशा खेळांमध्ये स्वतःची सपोर्ट टीम असते. जे अनेक वर्षांपासून खेळाडूंसोबत काम करत आहेत. आयओएने काही महिन्यांपूर्वी वैद्यकीय पथकाची नियुक्ती केली होती, जी स्पर्धेदरम्यान आणि नंतर खेळाडूंच्या रिकव्हरी आणि दुखापतींच्या व्यवस्थापनासाठी मदत करेल. ज्या खेळाडूंकडे न्यूट्रिशनिस्ट आणि फिजिओथेरपिस्टची स्वतःची टीम नाही, अशा खेळाडूंना मदत करण्यासाठीही ही टीम तयार करण्यात आली होती, असं पीटी उषा म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button