breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारणलेखसंपादकीयसंपादकीय विभाग

Ground Report : खासदार अमोल कोल्हे यांचे एक ‘स्टेटमेंट’ अन्‌ महाविकास आघाडीचा ‘सेल्फ गोल’

लंडनमधील २०० कोटींच्या हॉटेलचा आरोप भोसरीकरांच्या जिव्हारी : पक्षीय राजकारणात गाववाले मंडळीचा स्वाभिमान दुखावल्याची भावना 

पिंपरी । विशेष प्रतिनिधी 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवडमधील भोसरी विधानसभा मतदार संघातील राजकीय वातावरण तापले आहे. आरोप-प्रत्यारोपांची ‘सोशल मीडिया’वर  धुरळा सुरू असतानाच महाविकास आघाडीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या एका वक्तव्यामुळे मविआचा ‘सेल्फ गोल’ झाला आहे. 

सध्या अजित पवार गटात असल्याचा दावा करणारे माजी आमदार विलास लांडे यांच्या शैक्षणिक संस्थेसमोरील रस्त्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाची ‘शिव स्वराज्य’ सभा झाली. ही सभा ‘‘महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची’’ असल्याचा दावा सेलिब्रिटी प्रचारप्रमुख खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि पक्षाने दावा केला. महाराष्‍ट्राच्या स्वाभिमानासाठी काढलेल्या यात्रेत आणि सभेत मात्र भोसरीकर किंबहुना पिंपरी-चिंचवडकरांचा स्वाभिमान दुखावल्याची भावना निर्माण झाली आहे. 

‘‘भोसरीतील एका प्रतिष्ठित व्यक्तीचे लंडनमध्ये २०० कोटी रुपयांचे हॉटेल आहे..’’ असा जाहीर आरोप करीत हा पैसा कुठून आला… असा अप्रत्यक्ष सवाल खासदार कोल्हे यांनी जाहीरपणे उपस्थित केला. आरोपाचा रोख निश्चितच आमदार महेश लांडगे यांच्याकडे होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आणि लांडगे यांचे हॉटेल आहे किंवा नाही? याबाबत शहरात चर्चा सुरू झाली. 

वास्तविक, पिंपरी-चिंचवडची राजकीय वाटचाल पाहता शहरातील गावकी-भावकी आणि स्थानिक राजकारणामध्ये शहराबाहेरील किंवा राज्याच्या नेतृत्त्वाने अवास्तव लक्ष घातले की स्थानिक भूमिपुत्र चमक्तारिक रित्या पक्षभेद विसरुन एक होतात, ही वस्तुस्थिती आहे. प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यापासून अगदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत अनेक नेतृत्त्वांना हा अनुभव आला आहे. स्थानिक अस्मितेला हात घातला की, भूमिपुत्रांमधील स्वामिमान जागा होतो. ‘‘नको बारामती… नको भानामती.. आता पिंपरी-चिंचवडची धुरा राम-लक्ष्मणाच्या हाती’’ ही २०१७ मध्ये झालेली गर्जना त्याचे मूर्तरुप होती. आगामी किमान २५ वर्षेतरी पिंपरी-चिंचवडचे राजकारण गावकी-भावकी आणि भूमिपुत्रांच्या अवती-भवतीच फिरेल, असे राजकीय जाणकार सांगतात. 

मध्यंतरी, महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेले अजित गव्हाणे यांनी ‘‘भोसरीचा बकालपणा वाढला… भोसरीत राहणाऱ्या युवकांना नोकरी दिली जात नाही.. भोसरी बदनाम झाली आहे…’’ अशी टीका जाहीरपणे केली होती. त्यावेळीसुद्धा स्थानिक प्रतिष्ठीत व्यक्तींना ही बाब रुचलेली नाही. याबाबत त्यांनी खासगीमध्ये ‘‘राजकारणापायी भोसरीचे किंवा शहराचे नाव बदनाम करु नका..’’ असा सबुरीचा सल्लाही दिल्याचे सांगितले जाते. याउलट, आतापर्यंत माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, स्व. आमदार लक्ष्मण जगताप, माजी आमदार विलास लांडे यांच्यानंतर दुसऱ्या फळीत कोणताही स्थानिक नेत्याने राजकीय आरोप-प्रत्यारोप करताना गाववाल्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचेल, असे वक्तव्य केलेले नाही. खासदार अमोल कोल्हेंच्या वक्तव्यामुळे ‘‘आता बात भोसरीकरांच्या धंदा-पाण्यावर आणि स्वाभिमानावर आली…’’ त्यामुळे सर्वपक्षीय गाववाले यांच्यात नाराजीचा सूर असून, त्याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे. 

अमोल कोल्हेंचा वार, महेश लांडगेंचा पलटवार…!  

‘‘भोसरीतील प्रतिष्ठीत व्यक्तीचे लंडनमध्ये २०० कोटींचे हॉटेल आहे’’ असा आरोप मविआचे खासदार अमोल कोल्हे यांनी जाहीरपणे केला. त्यांचा रोख आमदार महेश लांडगे यांच्याकडेच होता. यावर लांडगे यांनी मोजक्या शब्दांत ‘चेकमेट’ केला. आमदार महेश लांडगे म्हणाले की, ‘‘एखाद्या भोसरीकराचे किंवा पिंपरी-चिंचवडकराचे २०० कोटीचे हॉटेल लंडनमध्ये असेल, तर ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. खासदार साहेबांचा रोख माझ्याकडे असेल… तर त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध करावे. मी आजच्या आज राजकारणातून निवृत्ती घेतो… पदाचा राजीनामा देतो… पण, केलेले आरोप सिद्ध करता आले नाहीत, तर खासदार काय करणार हेसुद्धा त्यांनी जाहीर करावे.’’ त्यामुळे खासदार कोल्हे यांना केलेल्या आरोपाची सिद्धता द्यावी लागणार हे निश्चित झाले. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांना भोसरीमध्ये सुमारे १० हजार मते कमी आहेत. या निवडणुकीच्या प्रचारात एकदाही आम्ही कोल्हेंवर टीका केली नाही. मी माझ्या नेत्यांचे विचार मांडत होतो. महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार केला. त्यामुळे निवडणूक विकासाच्या मुद्यावर आणि आपण सत्तेत असताना का प्रश्न सोडवले नाही? अशा अजेंड्यावर व्हावी, असे सूचक संदेशही लांडगे यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button