breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राजकारणातील बॅटींगसाठी पार्थ पवार इच्छूक

राजकारणात सक्रीय होण्याचे दिले संकेत , पदाधिकार्‍यांसमवेत जनसन्मान यात्रा स्थळाची पाहणी

पिंपरी : राष्ट्रवादीची जनसन्मा यात्रा येत्या शुक्रवारी (दि.16) पिंपरीत दाखल होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थितांशी मेळाव्यात संवाद साधणार आहेत. तर त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी या यात्रेदरम्यान आयोजित केल्या जाणार्‍या मेळाव्याची स्थळ पाहणी केली.

यावेळी प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर राजकारणातील बॅटींगकरिता नक्कीच इच्छूक असल्याचे सांगत सक्रीय राजकारणातील प्रवेशाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचा आत्मविश्वास मात्र दुणावला आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवसुराज्य यात्रेला पर्याय म्हणून ईजत पवार यांच्या राष्ट्रवादीने राज्यभरात जनसन्मान यात्रेचे आयोजन केले आहे. दोन दिवसांपुर्वीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची जाहीर सभा भोसरीत पार पडली. आता येत्या शुक्रवारी (दि.16) अजित पवार राष्ट्रवादीची सभा पिंपरीत येत आहे.

या यात्रेदरम्यान होणार्‍या जाहीर मेळाव्यात अजित पवार हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान आठवडाभरापुर्वी पार्थ पवार यांनी शहरातील पूरग्रस्त भागाला भेट दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या विविध सेलचे अध्यक्ष व पदाधिकार्‍यांची दोन तास बैठक घेत विविध विषयांची माहिती घेतली.

हेही वाचा –  “मला कोणीही फोन मेसेज करू नका…” ; खासदार सुप्रिया सुळेंचा मोबाईल हॅक

या बैठकीने पार्थ पवार यांच्या राजकारणातील सक्रीयतेचे संकत मिळत होते. मात्र, आपले वडील घेत असलेल्या जनसन्मान यात्रेच्या नियोजनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत, रविवारी (दि.1) सुट्टीच्यादिवशी त्यांनी पिंपरीतील नियोजित मेळाव्याच्या स्थळाची पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासमवेत आमदार अण्णा बनसोडे, माजी महापौर मंगला कदम, माजी नगरसेवक राजू मिसाळ, जगदिश शेट्टी, अ‍ॅड. गोरक्षनाथ लोखंडे,फजल शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसुराज्य यात्रा येत्या शुक्रवारी (दि.16) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शहरात निगडीत प्रवेश करेल. त्यानंतर पक्षाच्या दोन बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकांनंतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या उपस्थितीत होणार्‍या जाहीर मेळाव्यात अजित पवार हे मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याला सुमारे दहा हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील, असा अंदाज आमदार अण्णा बनसोडे यांनी वर्तविला आहे.

येत्या 16 ऑगस्टला होणार्‍या नियोजित मैळाव्याची पाहणी करण्यासाठी पार्थ पवार यांनी रविवारी (दि.11) सकाळी राष्ट्रवादीच्या एचए मैदानाची पाहणी केली. यावेळी याठिकाणी क्रिकेट खेळणार्‍या तरुणांना पाहून पार्थ यांना बॅटिंग करण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी मैदानावर जात हातात बॅट घेऊन, आपले बॅटींगचे कौशल्य दाखवून दिले. याचवेळी आमदार अण्णा बनसोडे यांनीदेखील बॅटींग केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button