breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर चेंबूरमध्ये नारळफेक, वाहन चालक थोडक्यात बचावला

ताफ्यावरच नारळ, शेण आणि बांगड्या फेकल्या गेल्या. प्रमोद शिंदे यांच्या गाडीवर नारळ भिरकावले यावेळी त्यांचा गाडीचालक थोडक्यात बचावला.

मुंबई : ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा गडकरी रंगायतन सभागृहात कार्यक्रम पार पडणार होता. मात्र या कार्यक्रमाला जात असताना चेंबूर येथे उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर नारळ फेकण्यात आले. अज्ञात व्यक्तिकडून नारळ फेकण्यात आला. हा व्यक्ती मनसैनिक असल्याचं बोललं जात आहे.

गाड्यांवर बांगड्या आणि शेण फेकलेही फेकले गेले. चार ते पाच गाड्यांचे नुकसान झालं आहे. वाहन चालकच्या दिशेने नारळ वेगाने आल्याने वाहनचालकांमध्ये अपघात होण्याची भीती निर्माण झाली. मात्र वाहनचालकांनी गाडीवर नियंत्रण मिळवत गाडी कंट्रोल केली. सर्वात पुढे ताफ्यामध्ये चेंबूरचे विभाग क्रमांक 9 चे प्रमुख प्रमोद शिंदे यांच्या गाडीवर नारळ भिरकावले असून त्याचा वाहन चालक थोडक्यात बचावला.

हेही वाचा      –        शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी माझ्या नादी लागू नये; राज ठाकरेंचा इशारा

ठाण्यात मोठा राडा झाला. ठाकरे गटाचे आणि मनसे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. ठाण्यात आज उद्धव ठाकरे गटाचा मेळावा होणार होता. पण त्याआधी सभागृहाच्या बाहेर मोठा राडा पाहायला मिळाला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचा ताफा येताच गाडीवर बांगड्या आणि नारळ फेकला. दोन्ही बाजुला कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आले आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. राडा करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

नमक हराम 2 ची उत्सुकता आहे. नागांचा मी अपमान करू शकत नाही. हे मांडूळ आहेत. गांढूळ नाही. हे दुतोंडी आहे. यांना फणा नाही. हे मोदींसमोर वळवळ करणारे मांढूळ आहे. हे लोटांगण घालतात. पँट तिकडे जाऊन खराब होत नाही. फोन आल्यावरच खराब होते. जसे असाल तसे या, फोन येताच पळतात नशीब पँट घातलेली असते, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाख शिंदेंवर निशाणा साधला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button