ताज्या घडामोडीमुंबई

नवी मुंबईतील ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ : आमदार गणेश नाईक 

मुख्यमंत्र्यांच्या या आदेशामुळे नवी मुंबईतील लाखो नागरिकांना फायदा

नवी मुंबई : मुंबई महापालिकेपाठोपाठ नवी मुंबईतील ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची मागणी आमदार गणेश नाईक यांनी सातत्याने लावून धरली असून गुरुवारी सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी याबाबत त्यांना आश्वासित केले. त्याबाबतचे आदेश दिल्याने नवी मुंबईतील लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या आदेशामुळे नवी मुंबईतील लाखो नागरिकांना फायदा होणार आहे. शहरातील जवळजवळ दोन लाख घरे ही ५०० चौरस फुटांपर्यंतची असून त्यांच्या मालमत्ता करापोटी मिळणाऱ्या अंदाजे २५ कोटींच्या रकमेचा फरक पडणार आहे.

नवी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी मालमत्ता करमाफी आणि मालमत्ता कर सवलतीचा ठराव १९ जुलै २०१९ रोजी नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजूर केला होता. याअंतर्गत ५०० चौरस फूट क्षेत्रफळापर्यंतच्या घरांना संपूर्ण मालमत्ता कर माफी देण्याचा निर्णय झाला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत गुरुवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी याबाबतचा निर्णय घेतला असून तात्काळ अंमलबजावणीचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या लाखो नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे.

  • गणेश नाईक, आमदार, ऐरोली विधानसभा
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button