breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

भोसरीतील महाविकास आघाडीत ‘‘बिघाडी’’? माजी नगरसेवक रवि लांडगे ‘उबाठा’ कडून संभाव्य उमेदवार!

काल शिव स्वराज्य निवडणूक सभा अन्‌ आज महाविकास आघाडीत ‘मिठाचा खडा’

अजित गव्हाणे, रवि लांडगे यांच्यात रस्सीखेच, सुलभा उबाळे स्पर्धेतून बाहेर?

पिंपरी | पिंपरी-चिंचवडमधील महाविकास आघाडीत मोठा ट्विस्ट तयार झाला आहे. उमेदवारीवरुन इच्छुकांमध्ये मोठी रस्सीखेच पहायला मिळत आहे. भोसरीतून भाजपा आमदार महेश लांडगे यांनो रोखण्यासाठी सर्व विरोधक एकवटे आहेत. शरद पवार गटाचे अजित गव्हाणे यांना तिकीट निश्चित मानले जात असतानाच, आता रवि लांडगे यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून ‘फिल्डिंग’ लावली आहे.

माजी नगरसेवक रवि लांडगे यांनी नुकतीच शिवसेना ठाकरे गटाचे ‘फायर ब्रँड’ नेते संजय राउत यांची भेट घेतली. यापूर्वीच त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतली होती. लोकसभा निवडणुकीनंतर मिळालेल्या मोठ्या यशानंतर शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा तीनही विधानसभा मतदार संघांवर शरद पवार गटाने दावा केला आहे. किंबहुना, शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी काल झालेल्या शिव स्वराज्य यात्रेच्या भोसरीतील सभेतही तशी जाहीर मागणी केली होती.

वास्तविक, सुरूवातील या मतदार संघावर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला होता. शिवसेनेच्या सुलभा उबाळे आणि धनंजय आल्हाट यांनी लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे काम केले. शिवसेनेला मानणारा मोठा मतदार या मतदार संघामध्ये आहे. त्यामुळे हा मतदार संघ ‘‘मशाल’’ ला सोडावा, असा शिवसैनिकांचा आग्रह आहे. त्यातच उबाळे आणि आल्हाट यांनी निवडणूक प्रचाराला सुरूवातही केली आहे.

हेही वाचा      –        शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी माझ्या नादी लागू नये; राज ठाकरेंचा इशारा

इतक्यात, भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेशकर्ते झालेले माजी नगरसेवक रवि लांडगे हेसुद्धा निवडणुकीसाठी इच्छुक असून, त्यांनी शिवसेना ‘मशाल’ हातात घेण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे.

तिकीटासाठी महाविकास आघाडीत पेच..

भोसरीत राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रेचे जंगी स्वागत झाले आणि दणदणीत सभा झाली. पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी धडाकेबाज भाषणे करत भाजप आमदार लांडगे यांच्यावर अप्रत्यक्ष तोफ डागली आणि एकप्रकारे प्रचाराचा नारळ फोडला. भाजपाचे महेश लांडगे यांच्या विरोधात तगडा उमेदवार राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे अशी अत्यंत चुरशीची लढत होणार, अशी चर्चाही सर्वत्र सुरू झाली. अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेनेही भोसरीसाठी आग्रह धरला, तर महाविकास आघाडीत तिकीट कोणाला द्यायचे असा प्रेच निर्माण होणार आहे.

भोसरीत शिवसेनेची ५० हजार मते..

शिवसेनेची स्वतःची अशी ५० हजार मते आजही कायम आहेत. त्यात महाआघाडीची मते एकत्र घेतल्यास विजयाची मशाल पेटणार असा दावा केला जातो आहे. विशेष म्हणजे, ‘‘भोसरी हा पहिल्यापासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, महाआघाडीत तो आम्हीच लढणार आहे’’ असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, १५ ऑगस्ट रोजी भव्य कार्यक्रमात रवि लांडगे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. आता महाआघाडीचा उमेदवार नेमका कोण असेल, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. महाआघाडीत दुफळी निर्माण झाली तर त्याचा आयताच फायदा महायुतीचे आमदार लांडगे यांना होऊ शकतो, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button