breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी माझ्या नादी लागू नये; राज ठाकरेंचा इशारा

Raj Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकून घोषणाबाजी झाल्याचा प्रकार बीडमध्ये घडला. या प्रकरणावरून मनसे नेते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, यावरून मनसे अधयक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी राज ठाकरेंनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

राज ठाकरे म्हणाले, मी सोलापूरमध्ये जे बोललो, ते सगळ्यांनी पाहिलं, ऐकलं पण त्यानंतर जाणीवपूर्वक केलेल्या बातम्या धक्कादायक होत्या. राज ठाकरेंचा आरक्षणाला विरोध वगैरे. वाट्टेल त्या बातम्या आल्या. २००६ साली मी माझ्या पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत आमची एकच भूमिका राहिली आहे. आरक्षण द्यायचंच असेल तर आर्थिक निकषांवर द्यावं. त्यावर माझं म्हणणं आहे की महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही.

देशात महाराष्ट्रासारखं दुसरं राज्य नाहीये. इथे इतक्या गोष्टी उपलब्ध असताना बाहेरच्या राज्यातल्या लोकांना इथे सगळ्या गोष्टी मिळत असताना आमच्या मुला-मुलींना त्या गोष्टी इथे मिळत नाहीत. आपण जर इथल्या मुलांसाठी या गोष्टी नीट वापरल्या तर आपल्याकडे आरक्षणाची गरजच नाहीये. आर्थिकदृष्ट्या मगासलेल्यांना आरक्षण देण्याऐवजी आपल्याकडे फक्त जातींचे राजकारण केलं जातं आणि माधी भडकवली जातात, असं राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा      –      बुलेटवर बऱ्याच जणींना घेऊन फिरलोय; अजित पवारांचं विधान

माझ्या दौऱ्यात जरांगे पाटलांचा काहीही संबंध नव्हता. पण त्यांच्या आंदोलनाच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी या प्रकारचं राजकारण करत आहेत. मराठवाड्यात मला ते दिसतंय. मराठवाड्यातले काही पत्रकारही त्यात सहभागी आहेत. मला त्यांची नावंही माहिती आहेत. ती योग्य ठिकाणी जातीलही. कुणाला पेव्हर ब्लॉकचे काँट्रॅक्ट्स मिळाले, कुणाला एमआयडीसीत जागा मिळाल्या, कुणाला किती पैसे मिळाले, त्यातून कशा गाड्या घेतल्या गेल्या अशा सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत आल्या आहेत. धाराशिवमध्ये तर तिथल्या लोकांना भडकवण्याचं काम काही पत्रकार करत होते. मी तिथल्या लोकांना वर बोलवत असताना पत्रकार म्हणत होते खाली या. तिथे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या जवळचे काही लोक होते, असं राज ठाकरे म्हणाले.

काल जे झालं(बीडमधील सुपारी फेक प्रकरण), त्यात तर शिवसेनेचा जिल्हाप्रमुखच होता. लोकसभेच्या निर्णयानंतर यांना वाटलं की मराठवाड्यात मतदान झालं. पहिली गोष्ट शरद पवार व उद्धव ठाकरेंनी समजून घेतली पाहिजे की ते नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्याविरोधात झालेलं मतदान होतं. विरोधकांच्या प्रेमाखातर झालेलं मतदान नव्हतं. त्यामुळे त्यांना जी मतं मिळाली, मुस्लीम समाजानं देशभरात मोदींविरोधातली मतं दिली. दलित बांधवांनी भाजपाच्या विरोधात मतं दिली. पण या दोघांना वाटतंय की यांच्या प्रेमाखातर ते मतदान झालंय. त्यांना वाटतंय येत्या निवडणुकीतही अशीच खेळी करावी, असं राज ठाकरे म्हणाले.

तो कालच्या प्रकारातला शिवसेनेचा जिल्हाप्रमुख ओरडत गेला की एक मराठा, लाख मराठा. म्हणजे त्यांना दाखवायचंय की हे जरांगे पाटलांचे लोक आहेत. पण त्यांच्या आडून यांचं विधानसभेचं राजकारण सुरू आहे. हे लोकांसमोर येणं गरजेचं आहे. शरद पवारांसारखा ८३ वर्षांचा माणूस वक्तव्य करतो की महाराष्ट्रात मणिपूर होईल? या लोकांनी मणिपूर होऊ नये याची चिंता करायला हवी. पण ते असं म्हणत असतील तर यांच्या डोक्यात काय असेल याची कल्पना यावी. पुढच्या तीन साडेतीन महिन्यात यांना मराठवाड्यात ज्या काही गोष्टी घडवायच्या असतील, त्या घडवण्यासाठी यांच्या या सगळ्या गोष्टी चालू आहेत, असंही राज ठाकरे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button