breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्रातील तरुणांना जर्मनीत मिळणार रोजगार, सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | महाराष्ट्रातील तरुणांना जर्मनीत नोकरी देण्यासाठी राज्य सरकारनं पुढाकार घेतलाय. याबाबत महाराष्ट्र सरकारनं जर्मनीच्या बाडेन वूटेनबर्ग या राज्याशी करार करुन ऐतिहासीक योजना सुरु केली आहे. युरोपीय देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे. महाराष्ट्रातील युवकांना कौशल्य शिक्षण देऊन परदेशामध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील कुशल, अकुशल, बेरोजगारांसाठी जर्मन भाषेचे मोफत प्रशिक्षण आपल्याचं जिल्ह्यात देण्यात येणार आहे.

जर्मनी येथे नोकरी मिळवण्यासाठी महाराष्ट्रातच निवड प्रक्रिया व नोकरीच्या नियुक्तीचे वाटप, व्हिसा आणि पासपोर्टसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जर्मनी येथे नोकरी करण्यासाठी सुरुवातीच्या काळात सरकार आवश्यक मदतही करणार आहे.

हेही वाचा      –        मराठी सिनेसृष्टीवर शोककळा! ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन

जर्मनीत या क्षेत्रात मिळणार संधी?

परिचारिका (रुग्णालय) वैद्यकीय सहाय्यक (एमएफए)
प्रयोगशाळा, रेडियोलॉजी, दंतशल्य सहाय्यक
आजारी व वृद्ध व्यक्तींसाठी शुश्रूषा सेवक
फिजिओथेरपीस्ट
दस्तऐवज आणि संकेतीकरण
लेखा व प्रशासन

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button