breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र

मराठी सिनेसृष्टीवर शोककळा! ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन

Vijay Kadam | मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन झाले आहे. आज १० ऑगस्ट रोजी त्यांनी सकाळी अखेरचा श्वास घेतला. विजय कदम हे गेल्या दिड वर्षापासून ते कर्करोगाने ग्रस्त होते. विजय कदम यांच्या निधनानंतर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे.

विजय कदम यांचे आज सकाळी अंधेरी येथील राहत्या घरी निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्या पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंधेरी-ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. गेले दीड वर्ष ते कर्करोगाशी लढा देत होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु आज सकाळी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

हेही वाचा      –      MHADA Lottery 2024 | म्हाडाची लॉटरी जाहीर, कोणत्या गटात किती घरं, किंमत किती?

विजय कदम यांनी आजवर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या विनोदी भूमिका विशेष गाजल्या होत्या. आनंदी आनंद (१९८७), तेरे मेरे सपने (१९९६), देखणी बायको नाम्याची (२००१), रेवती (२००५), टोपी घाला रे (२०१०), ब्लफमास्टर (२०१२), भेट तुझी माझी (२०१३) आणि मंकी बात (२०१८) अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांसोबतच विजय कदम यांनी काही नाटके आणि मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांनी तूर तूर, पप्पा सांगा कोणाचे, इच्छा माझी पुरी करा आणि सही दे सही या मालिकांमध्ये ते दिसले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button