breaking-newsताज्या घडामोडीपुणे

भाटघर धरण 100 टक्के भरले

पुणे : वेळवंडी नदीवरील भाटघर धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून विसर्ग सुरु झाला आहे.

नीरा पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता यो स भंडलकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. भाटघर धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाचे स्वयंचलित दरवाजे कार्यान्वित झाले आहेत. या दरवाजांमधून नदीपात्रामध्ये 7 हजार क्युसेक विसर्ग सुरु झाला आहे. दरम्यान विद्युत निर्मिती गृहद्वारे 1 हजार 631 क्युसेक विसर्ग सुरु आहे. एकूण 8 हजार 631 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

हेही वाचा –  Ground Report : चिंचवडकरांची खंत… सर्व प्रकल्प भोसरीत अन्‌ आमच्या वाट्याला खड्‍डेच?

पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी-जास्त करण्याची शक्यता आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी-, असे आवाहन भंडलकर यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button