breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

‘सुवर्णपदक जिंकणाराही माझा मुलगाच आहे’; नीरज चोप्राच्या आईने मन जिंकलं!

Neeraj Chopra | पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने रौप्यपदक जिंकून भारताला यंदाच्या ऑलिम्पिकमधील पाचवे पदक मिळवून दिले. नीरज चोप्राने अंतिम फेरीत ८९.४५ मीटरवर भाला फेकला. तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटर भालाफेक करत सुवर्णपदक पटकावले. रौप्यपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राच्या आईच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

नीरज चोप्राची आई सरोज देवी म्हणाल्या, नीरजला रौप्यपदक मिळाले असले तरी आम्ही खूप आनंदी आहोत. हेही सुवर्णपदक मिळण्यासारखेच आहे. तो जखमी होता, तरीही त्याने चांगली कामगिरी केली, याबद्दल आम्हाला आनंद आहे. तसेच पाकिस्तानच्या नदीमने सुवर्णपदक जिंकले, त्याबद्दलही आनंद वाटतो. सर्वच खेळाडू मला मुलासारखे आहेत.

हेही वाचा      –      लाडक्या बहिण योजनेचे पैसे केव्हा मिळणार? अजित पवारांनी सांगितली तारीख.. 

नीरज चोप्राचे वडील म्हणाले, प्रत्येकाचा दिवस असतो, आज पाकिस्तानच्या अर्शद नदीमचा दिवस होता. आमच्या मुलाने सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे, त्याचा आम्हाला अधिक आनंद आणि अभिमान वाटतो.

सुवर्णपदक जिंकणाराही माझा मुलगाच आहे, अशी प्रतिक्रिया दिल्यामुळे नीरज चोप्राच्या आईचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. आपल्या मुलाचा दुसरा क्रमांक आला तरी पहिल्या क्रमाकांवर असलेल्या मुलाबाबतही तिला माया वाटावी, हे माणुसकीचे उत्तम उदाहरण असल्याचे अनेकजण बोलत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button