ताज्या घडामोडीपुणे

शालेय मंत्रिमंडळाचा शपथ ग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

श्री. एस. पी. देशमुख शिक्षण संस्था संचालित विद्याव्हॅली इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात शपथ ग्रहण समारंभ

चाकणः श्री. एस. पी. देशमुख शिक्षण संस्था संचालित विद्याव्हॅली इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी शालेय मंत्रिमंडळाचा शपथ ग्रहण समारंभ उत्साहात पार पडला.
विद्यार्थ्यामध्ये जबाबदारी , नेतृत्व आणि शिस्त निर्माण करणे या हेतूने शाळा प्रशासन अशा कार्यकमाचे नियोजन दरवर्षी करत असते.
या कार्यक्रमाला सेवानिवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ व सध्या कार्यरत संयुक्त संचालक (संरक्षण मंत्रालय) मा.डॉ.श्नी. ए. जी. नगरकर प्रमुख अतिथी म्हणून लाभले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
निवडणूक प्रक्रियेद्वारे पदनिश्चिती झालेल्या मुख्य विद्यार्थी प्रतिनिधी ईशान बनकर व उपमुख्य विद्यार्थी प्रतिनिधी सोनाक्षी सरोदे तसेच इतर विभाग प्रमुखांना संबंधीत अधिकारांच्या बॅजचे सन्मानपूर्वक वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. शामराव देशमुख सर यांनी पदाची जबाबदारी व कर्तव्य याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी संस्थेच्या सचिव मा. रोहिणी ताई देशमुख व विद्या निकेतन स्कूलचे मुख्याध्यापक श्री.दिपक शिंदे सर यांची उपस्थिती प्रार्थनीय होती. या वेळी शाळेच्या संगीत शिक्षिका नयन बाळसराफ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध वाद्यांच्या साथीने सुमधुर गीताचे सादरीकरण केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती रणदिवे यांनी नवीन विद्यार्थी मंडळाला त्यांच्या जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडण्याची आणि शाळेच्या मुल्यांचे पालन करण्याची शपथ दिली व पुढील वाटचालीस सदिच्छा व्यक्त केली .
विद्यार्थी प्रतिनिधी ईशान बनकर व सोनाक्षी सरोदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी शास्त्रज्ञ होण्याचा राजमार्ग , संशोधनाचे देशाच्या प्रगतीतील महत्व यांविषयी मोलाचे मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. सायन दासगुप्ता यांनी तर पाहुण्यांचा परिचय व स्वागत सौं सीता नायकवडी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता कु मेघना दासगुप्ता यांच्या आभारप्रदर्शनाने झाली. अशा प्रकारे शाळेच्या मुख्याध्यापिका , सर्व व्यवस्थापन मंडळ , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने सदर कार्यक्रम संपन्न झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button