breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मावळातील चार महत्वाच्या विकास कामांचा 30 ऑगस्ट पर्यंत निघणार कार्यारंभ आदेश

पुणे : कार्ला येथील आई एकविरा देवी तीर्थक्षेत्र विकास आराखडा, संत जगनाडे महाराज तीर्थक्षेत्र विकास आराखडा, कार्ला येथील चाणक्य सेंटर फॉर एक्सलेन्स, लायन्स व टायगर पॉईंट येथील ग्लास स्कायवॉक या कामाची निविदा प्रक्रिया 30 ऑगस्ट 2024 पर्यंत पूर्ण करून कार्यारंभ आदेश द्या, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

मावळातील प्रमुख विकास कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या या बैठकीस क्रीडा मंत्री संजय बनसोडे, मावळचे आमदार सुनील शेळके तसेच जलसंपदा, नियोजन, वित्त, क्रीडा, सार्वजनिक बांधकाम विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, पर्यटन विभाग या विभागांचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव यांसह प्रमुख अधिकारी आणि व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पुण्याचे जिल्हाधिकारी, पीएमआरडीएचे आयुक्त उपस्थित होते.

बैठकीत कार्ला येथील आई एकविरा देवी तीर्थक्षेत्र विकास आराखडा, संत जगनाडे महाराज तीर्थक्षेत्र विकास आराखडा, कार्ला येथील चाणक्य सेंटर फॉर एक्सलेन्स, लायन्स व टायगर पॉईंट येथील ग्लास स्कायवॉक या कामाची निविदा प्रक्रिया 30 ऑगस्ट 2024 पर्यंत पूर्ण करून कार्यारंभ आदेश देण्याबाबतच्या सूचना अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

हेही वाचा     –      महागाईतून सर्वसामान्यांना दिलासा! वर्षभरानंतर डाळींच्या दरात ‘इतकी’ घसरण 

लोणावळा व कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालय नूतन इमारतीमधील उर्वरित कामे, शस्त्रक्रिया गृह मोड्युलर करणे, फर्निचर व इतर कामांची निविदा प्रक्रिया तात्काळ राबवून दोन्ही रुग्णालये लवकरात लवकर सर्वसामान्यांसाठी खुली करण्याबाबत पवार यांनी निर्देश दिले.

जांभूळ येथील क्रीडा संकुलाचा) प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी प्रतिक्षेत आहे. यासाठी राज्य क्रीडा विकास समितीची तात्काळ बैठक आयोजित करुन त्यात मंजुरी मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

इंद्रायणी नदीवरील टाकवे व कार्ला–मळवली रस्त्यावरील पुलांच्या कामाबाबत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. ही कामे तात्काळ पूर्ण करावी. कान्हे रेल्वे उड्डाणपूल, एडीबी अंतर्गत कान्हे ते सावळा रस्ता यांसह इतर छोट्या – मोठ्या विकासकामांबाबत सखोल आढावा घेत सर्व विकासकामे अतिशय गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्याबाबत पवार यांनी सांगितले.

मागील साडेचार वर्षात मावळ तालुक्यात अनेक विकास कामे व महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात आले. या कामांचे लोकार्पण करण्यासाठी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार मावळमध्ये येणार आहेत. त्यांच्या हस्ते विकासकामे आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण केले जाणार आहे, असे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button