विनेश फोगाट ऑलिंपिकच्या अंतिम फेरीत अपात्र ठरणं धक्कादायक; पंतप्रधान मोदींकडून भावना व्यक्त
PM Narendra Modi | भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगट पॅरीस ऑलिम्पिकमध्ये ५० किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात पोहोचली होती. मात्र तिचे सामन्यापूर्वी वजन वाढल्यामुळे तिला अपात्र ठरविण्यात आले आहे. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, विनेश, तू चॅम्पियन आहेस! तू भारताचा अभिमान आहात आणि प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणा आहे. आज सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मला माहित आहे की, आव्हान स्वीकारणे हा तुझा स्वभाव आहे. तू मजबूतीने कमबॅक करशील.
हेही वाचा – भारताला सर्वात मोठा धक्का! विनेश फोगट ऑलम्पिक मधून बाहेर
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी चर्चा केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी पीटी उषा यांच्याकडून या विषयावर आणि विनेशला अपात्र ठरवल्यानंतर आता भारताकडे कोणते पर्याय आहेत याबद्दल प्राथमिक माहिती घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.