breaking-newsताज्या घडामोडीपुणे

11 मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक

पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी

पुणे : आंबेगाव, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, खेड भागातील मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. या चोरट्याने तब्बल 11 मंदिरांमध्ये चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.विनायक दामू जिते (रा. कान्हूर मेसाई, ता. शिरूर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मंदिरात चोरी झाली होती. पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे आणि त्यांच्या पथकाने इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मंदिरांमध्ये चोरी झालेल्या ठिकाणी जाऊन सीसीटीव्हीची पाहणी केली. त्यातून पोलिसांनी संशयित आरोपीची ओळख पटवली.

संशयित आरोपी शिक्रापूर येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर  पोलिसांनी विनायक जिते याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने मंदिरात चोरी केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

हेही वाचा     –      ‘बांगलादेशातून समजून घ्यावं आरक्षण किती महत्वाचा विषय’; मनोज जरांगे पाटील

विनायक जिते याने पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिंगवे येथील भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर, लाखनगाव येथील देवीचे मंदिर, मांडळेवाडी येथील हनुमान मंदिर, जाकरवाडी येथील बोल्हाई माता मंदिरात चोरी केली. त्यासह शिक्रापूर येथील राऊतवाडी येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर, शिक्रापूर येथील कवटेमळा येथील वडजाई माता मंदिर, खेड राजगुरूनगर मधील कान्हेरसर येमाई जुने ठाणे मंदिर, शिरूर सविंदणे येथील काळूबाई मंदिर, रांजणगाव फंडवस्ती येथील तुकाई माता देवी मंदिर, घोडेगाव शिंदेवाडी येथील खंडोबा मंदिर, कळमजाई मंदिर, अहमदनगर जिल्ह्यातील सुपा येथील तुकाई मंदिर, वाडेगव्हाण पारनेर, नगर एमआयडीसी येथील खंडोबा मंदिर शिव मल्हारगड पिंपळगाव या मंदिरात चोरी केली आहे.

आरोपीकडून सोन्या-चांदीचे दागिने, चांदीच्या वस्तू, चांदीचे मुखवटे, पितळी धातूच्या वस्तू, इलेक्ट्रोनिक साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण चार लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button