ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)चे युवक शहर अध्यक्ष इम्रानभाई शेख यांची “हडपसर विधानसभेच्या ” निरीक्षकपदी निवड

कार्यअध्यक्ष सागर तापकीर यांना शिरूर विधानसभेची जबाबदारी

पिंपरी : आगामी विधानसभेच्या पार्श्र्वभूमीवर प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या व युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)चे युवक शहर अध्यक्ष इम्रानभाई शेख यांची आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रपवार पक्षाच्या “हडपसर विधानसभेच्या”निरीक्षकपदी तर कार्यअध्यक्ष सागर तापकीर यांना शिरूर विधानसभेची जबाबदारी निवड करण्यात आली.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिरुर लोकसभा मतदार संघात खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ संपूर्ण भोसरीविधानसभेत शहरअध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वात युवक आणि महिला संघटनेने एकतर्फी किल्ला लढवत खासदार डॉ अमोल कोल्हे यांना मोठे मताधिक्य मिळवून दिले होते.इम्रान शेख यांनी लोकसभा निवडणुकीत भोसरी विधानसभेत दुसऱ्या/तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्याना सोबत घेत उत्तम सोशल इंजिनीअरिंग करीत भोसरी विधानसभेत बूथ कमिट्याच्या माध्यमातून खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्यासाठी संपूर्ण मतदारसंघात जोरदार मोर्चे बांधणी केली होती. खासदार कोल्हे यांनी देखील जाहीर कबुली देताना इम्रान शेख व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले होते.या कामाची दखल म्हणून पक्षश्रेष्ठी करुन युवक अध्यक्ष इम्रान शेख यांची हडपसर तसेच कार्याध्यक्ष सागर मच्छिंद्र तापकीर यांची शिरूर विधानसभा निरीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे.

यावेळी बोलताना इम्रान शेख म्हणाले “भोसरी विधानसभेत भाजप आमदार तसेच अजितपवार गटातील बलाढ्यटीम समोर असताना फक्त पक्षाचे एकनिष्ठ प्रामिणिक कार्यकर्ते,युवक/महिला सहकारी आणि अल्पसंख्याक समाजातील महत्त्वाचे साथीदार यांच्या जीवावर खासदार अमोल कोल्हे यांना १ लाख १८ हजार इतक मताधिक्य मिळवता आले याचा आम्हाला अभिमान आहे. आदरणीय खासदार सुप्रिया ताई सुळे आणि डॉ अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात पक्षश्रेष्ठीनी दिलेली जबाबदारी अगदी प्रामाणिकपणे पार पाडण्यास मी कटिबद्ध असून पक्ष संघटना वाढीसाठी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचे शिव फुले शाहू आंबेडकर विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम माझ्या वतीने केले जाईल याची गाव्ही देतो.’असे ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button