ताज्या घडामोडीराष्ट्रिय

बदलापूरच्या माणकिवली एमआयडीसीत रासायनिक कंपनीत मोठा स्फोट

रहिवाशी चाळीत रिअ‍ॅक्टर पडल्याने चिमुकलीसह तीनजण जखमी

बदलापूर : बदलापूरच्या माणकिवली एमआयडीसीत रासायनिक कंपनीत मोठा स्फोट झाला. यात संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. हा स्फोट इतका भीषण होता, की रिअ‍ॅक्टरचा रिसिव्हर उडून तब्बल 400 मीटर लांब असलेल्या एका चाळीवर जाऊन कोसळला. यात चाळीत राहणाऱ्या कुटुंबातील लहान मुलीसह तिघे जखमी झाले आहेत. सुदैवाने कंपनीतील कोणत्याही कामगाराला मात्र इजा झालेली नाही.

बदलापूरच्या माणकिवली एमआयडीसीत रेअर फार्मा नावाची कंपनी असून त्यात केमिकल्स उत्पादन केलं जातं. आज पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास कंपनीत रिअ‍ॅक्टरमध्ये प्रक्रिया सुरू असताना अचानक रिसिव्हरमध्ये स्फोट झाला. यानंतर तिथेच असलेल्या मिथेनॉल या ज्वलनशील पदार्थांच्या ड्रम्सने सुद्धा पेट घेतला. त्यामुळे संपूर्ण कंपनी आगीत भस्मसात झाली. हा स्फोट इतका भीषण होता की रिअ‍ॅक्टर सोबत असलेला रिसिव्हर उडून माणकिवली गावातील एका चाळीवर जाऊन कोसळला. या चाळीतील एका कुटुंबातले पुरुष महिला आणि लहान मुलगी असे तिघे या घटनेत जखमी झाले असून यापैकी दोघांना मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलंय, तर एकावर बदलापूरमध्येच उपचार सुरू असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने यांनी दिली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button