ताज्या घडामोडीमनोरंजनराष्ट्रिय

दक्षिण केरळमधील वायनाडमध्ये मोठी दरड कोसळली

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन याची केरळच्या सीएम रिलीफ फंडमध्ये 25 लाखांची मदत

केरळ : केरळमध्ये तूफान पाऊस असल्याने अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाल्याचे बघायला मिळतंय. त्यामध्येच दक्षिण केरळमधील वायनाडमध्ये मोठी दरड कोसळली आहे. या भूस्खलनात अनेकांचा मृत्यू देखील झालाय. हेच नाही तर अनेक लोक हे गंभीर जखमी असल्याची देखील माहिती मिळतंय. या घटनेनंतर लगेचच केरळ सरकारकडून बचावकार्याची सुरूवात देखील करण्यात आलीये. आजूबाजुची संपूर्ण गावेही जलमय झाली आहेत. केरळ सरकारच्या मदतीला अनेक कलाकार धावले आहेत. त्यांनी केरळ सीएम रिलीफ फंडात देणगी मोठ्या प्रमाणात देण्यास सुरूवात केलीये.

साऊथच्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट देखील शेअर केल्या आहेत. कलाकार या नैसर्गिक आपत्तीच्या काळात सरकारसोबत खंबीरपणे उभे असल्याचे दिसतंय. साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. ही पोस्ट त्याने केरळच्या लोकांसाठी लिहिल्याचे बघायला मिळतंय.

अल्लू अर्जुन याने लिहिले की, वायनाडमध्ये नुकताच झालेल्या भूस्खलनामुळे मला खूप दु:ख झाले आहे. केरळने मला नेहमीच खूप जास्त प्रेम दिले आहे. मला केरळच्या सीएम रिलीफ फंडमध्ये 25 लाखांची मदत करायची आहे, जेणेकरून मदत कार्य चांगल्याप्रकारे होऊ शकेल. भूस्खलनामध्ये अडकलेल्या लोकांना शक्ती मिळावी आणि ते सुरक्षित राहावे, यासाठी मी प्रार्थना करत असल्याचेही अल्लू अर्जुन याने म्हटले.

फक्त अल्लू अर्जुन हाच नाही तर रिपोर्टनुसार अभिनेता विक्रमने 20 लाख, दुलकर सलमानने 35 लाख, फहद फासिलने, 25 लाख, नजरिया नाजिमने 25 लाख, सूर्या 35 लाख, रश्मिका मंदानाने 10 लाख याप्रमाणे अनेकांनी मदत केल्या आहेत. हा मदतीचा आकडा सतत वाढताना दिसतोय. केरळमध्ये मोठे नुकसान झाल्याचे देखील बघायला मिळतंय.

कोरोना काळातही अल्लू अर्जुन आणि इतर साऊथचे कलाकार मदतीला धावून आल्याचे बघायला मिळाले. त्यांनी सीएम रिलीफ फंडमध्ये मोठी रक्कम जमा केली होती. आता अल्लू अर्जुन याने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसतंय. चाहते या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. अनेकांनी अल्लू अर्जुन याचे काैतुक केल्याचे देखील दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button