breaking-newsTOP Newsटेक -तंत्रव्यापार

UPI वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ बँक ग्राहकांना उद्या ऑनलाइन पेमेंट करता येणार नाही

UPI Payment :  भारतात सध्या UPI पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. अनेकजण व्यवहारादरम्यान UPI पेमेंटला प्राधान्य देताना दिसतात. यातच आता HDFC बँक वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उद्या अर्थात ४ ऑगस्ट २०२४ रोजी एचडीएफसी बँकांचे यूपीआय पेमेंट सेवा बंद राहणार आहे. एचडीएफसी बँकेने डाउनटाइम अलर्ट जारी केले आहे. यासाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे.

बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, रात्री 12:00 ते पहाटे 03:00 वाजेपर्यंत सिस्टम देखभालीचे काम केले जाणार आहे. या कालावधीत सर्व ऑनलाइन पेमेंट बंद राहतील. याचा अर्थ तुम्ही सुमारे 3 तास ​​UPI पेमेंट करू शकणार नाही. याचा परिणाम  HDFCच्या सर्व बँक वापरकर्त्यांना होणार आहे.

हेही वाचा –  उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांवर नाव न घेता हल्ला

या कालावधीत बचत आणि चालू खातेधारक दोन्ही व्यवहार करू शकणार नाहीत. यामध्ये अनेक थर्ड पार्टी ॲप्सचाही समावेश आहे. त्यामुळे एचडीएफसी बँक खातेधारकांनी आजच एटीएममधून पैसे काढून ठेवा. ज्यामुळे तुम्हाला अडचण निर्माण होणार नाही.

एचडीएफसीच्या या सर्व्हिसचा परिणाम  सर्व अॅप्सवर होणार आहे. यात HDFC Mobile Banking App, Gpay, WhatsApp Pay, Paytm, Shriram Finance आणि Mobiknwik या अॅप्सचा समावेश आहे. परंतु POS च्या मदतीने होणाऱ्या ट्रान्झॅक्शनवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.

बँकेशी संबंधित तांत्रिक त्रुटी आणि अपडेट्समुळे वेळोवेळी सिस्टम मेंटेनन्सचे काम केले जाते. यासाठी ३ ते ५ तास लागतात. अशा वेळी ग्राहकांना बँकेकडून आधीच संदेश दिला जातो. बँकेशी संबंधित ॲप्स त्या काळात काम करत नाहीत. मात्र ठराविक वेळानंतर ही सेवा पुन्हा सुरळीतपणे सुरू होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button