breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ‘अंधश्रद्धा निर्मुलन कक्ष’

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये अंधश्रद्धा निर्मुलन कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून आलेल्या आदेशानुसार याची स्थापना करण्यात आली असून जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हा कक्ष काम करणार आहे.

राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) डॉ. छेरिंग दोरजे यांनी आदेश काढला आहे. ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अधिनियम 2013’ नुसार पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) आणि पोलीस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रात पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा) यांची दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार असल्याचे डॉ. दोरजे यांच्या आदेशात नमूद आहे.

हेही वाचा    –      ..तर पुढचा मुख्यमंत्री मीच; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं विधान 

महासंचालक कार्यालयाकडून आलेल्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘अंधश्रद्धा निर्मुलन कक्ष’ स्थापन केला आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांची दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक (गुन्हे) हे पोलीस ठाणे स्तरावर अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याच्या अंमलबजावणीबाबत नियंत्रण ठेवणार आहेत.

सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर म्हणाले, “पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व पोलीस ठाण्यांमध्ये अंधश्रद्धा निर्मुलन कक्ष कार्यान्वित झाला आहे. अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याची अंमलबजावणी योग्य रीतीने करण्याबाबत हा कक्ष काम करत आहे.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button