breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पावणेदोन लाखांची लाच घेताना पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात

पिंपरी : बांधकाम व्यावसायिकाने ग्राहकाला विकलेली सदनिका ग्राहकाच्या परस्पर दुसऱ्या व्यक्तीला विकली. त्याबाबत ग्राहकाने पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करून मदत करण्यासाठी दिघी पोलीस ठाण्यातील एका पोलीस अंमलदाराने ग्राहकाकडे दोन लाखांची लाच मागितली. त्यातील एक लाख 70 हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अंमलदाराला रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी (दि. 31) दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास आळंदी-विश्रांतवाडी रोडवर आंबा चौकाजवळ करण्यात आली.

अमोल दशरथ जाधव (वय 42, नेमणूक – दिघी पोलीस स्टेशन) असे रंगेहात पकडलेल्या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. याप्रकरणी 42 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

हेही वाचा     –      नाशिक, अहिल्यानगर, अमरावती, गडचिरोली जिल्ह्यात नवीन ‘एमआयडीसी’

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी चोवीसावाडी चऱ्होली येथे एका बांधकाम व्यावसायिकाकडून सदनिका खरेदी केली. ती सदनिका बांधकाम व्यावसायिकाने तक्रारदार यांच्या परवानगीशिवाय परस्पर दुसऱ्या व्यक्तीला विकली. याबाबत तक्रारदार यांनी बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत दिघी पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला होता. या तक्रारी अर्जावरून बांधकाम व्यावसायिकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यास मदत करून पुढील योग्य ती मदत करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पोलीस अंमलदार अमोल जाधव यांनी दोन लाख रुपयांची लाच मागितली.

याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने बुधवारी दुपारी सापळा लावला. त्यावेळी अमोल जाधव यांनी तडजोडीअंती एक लाख 70 हजार रुपये लाच स्वीकारली. लाच घेताना जाधव यांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button