ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आषाढी यात्रेत हरवलेल्या श्वानाने मालकाला भेटण्यासाठी चक्क राज्याची सीमा ओलांडली

श्वान परतल्यानंतर गावकऱ्यांनी काढली मिरवणूक, मालकाचे अश्रू अनावर

महाराष्ट्र : सोशल मीडियावर दररोज असंख्या फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात एका श्वानाने मालकाला भेटण्यासाठी चक्क राज्याची सीमा ओलांडली, हा हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बेळगाव येथील एका फेसबुक पेजने ही घटना उघडकीस आणली आणि असे नमूद केले की, पंढरपूरला वारकरी माणसाबरोबर आलेला आणि आषाढी एकादशीला गर्दीत हरवलेला श्वान सुमारे दोनशे किलोमीटर अंतर चालून घरी पोहोचला.

“पंढरपूरमधील आषाढी यात्रेदरम्यान हरवलेल्या एका निष्ठावान कुत्र्याने कर्नाटकातील यमगर्णी या आपल्या गावी २०० किलोमीटर चालत जाऊन सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला. त्यानंतर, बेळगावी जिल्ह्यातील प्राणी कल्याण संघटनेने या श्वानाचा फोटो ऑनलाइन शेअर केला.

गावकरी आणि त्याचे मालक ज्ञानदेव कुंभार यांनी श्वानाला प्रेमाने महाराज म्हणून संबोधले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील पंढरपूर येथील यमगर्णी ते विठोबा मंदिरापर्यंतच्या पायी दिंडीत कुंभार सहभागी झाले होते. कुंभार यांच्याबरोबर त्यांचा पाळीव श्वान महाराजही संपूर्ण अंतर पायी चालत गेल्याची माहिती मिळाली, मात्र तीर्थक्षेत्रातील गर्दीत तो हरवला. सर्व प्रयत्न करूनही, कर्नाटकातील गावी परतताना कुंभार यांचा पाळीव प्राणी सापडलाच नाही. पण श्वान चमत्कारिकपणे संपूर्ण अंतर चालून परत त्याच्या मालकाकडे परतला.

ज्या दिवशी कुंभार यांनी वार्षिक वारी पदयात्रा व दर्शनाची सांगता झाल्यावर परतण्याचा बेत केला, त्या दिवशी ते महाराजाशिवाय घरी गेले. घरी परतल्यावर त्यांना श्वान शेपूट हलवत त्यांच्या घराच्या गेटवर उभा असलेला दिसला. २८ जुलै रोजी श्वान स्वतःहून गावात परतल्याचे फेसबुक पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

“सर्वांना आश्चर्यचकित करून, हा कुत्रा काल यमगरणीत दिसला, त्याने पायीच लांबचा प्रवास केला. याला दैवी चमत्कार म्हणत गावकरी आनंदित झाले.” असं कॅप्शन या व्हायरल पोस्टला देण्यात आलं. महाराज परत आल्याने गावकरी भारावून गेले. यानंतर, त्यांनी विठ्ठल मंदिरापासून कुंभार यांच्या घरापर्यंत जल्लोषी मिरवणूक काढली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button