breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पुणे पोर्श कार अपघात प्रकरण : ७ आरोपींविरोधात ९०० पानांचं आरोपपत्र दाखल

Pune Porsche Car Accident | कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोर्श कारचालक अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी सात आरोपींविरोधात न्यायालयात ९०० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तब्बल पन्नास साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही चित्रीकरणासह आरोपींच्या मोबाइलचे विश्लेषण, प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा अहवाल आदी महत्त्वपूर्ण पुरावे या आरोपपत्रातून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने न्यायालयात सादर केले आहेत.

विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल आणि शिवानी अगरवाल (दोघे रा. बंगला क्रमांक एक, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे, अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड यांच्याविरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांच्या न्यायालयात दाखल झालेल्या या आरोपपत्रात अनेक ठोस पुरावे नमूद आहेत.

हेही वाचा     –      मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून बाणेर परिसरातील पूरग्रस्त भागांची पाहणी

अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे म्हणाले, आम्ही गुरूवारी पुण्याच्या न्यायालयात ९०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात अल्पवयीन मुलाचे पालक, दोन डॉक्टर आणि ससून जनरल हॉस्पिटलचा एक कर्मचारी आणि दोन मध्यस्थांचा समावेश आहे. आरोप पत्रात ५० साक्षीदारांच्या जबाब नोंदवण्यात आले आहे. दोषारोपपत्रात अपघात परिणाम विश्लेषण अहवाल, तांत्रिक पुरावे, न्यायवैद्यक प्रयोगशाळा आणि डीएनए आदी अहवालाचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button