breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीतील पूरपरिस्थितीनंतर तातडीने औषध व धुरफवारणी करा!

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांची प्रशासनाला सूचना

पिंपरी | पिंपरी चिंचवड परिसरात २४ जुलै रात्री पासून व २५ जुलै दिवसभर अतिवृष्टी झाली. सलग दोन दिवस बरसलेल्या पावसामुळे भोसरी विधानसभा परिसरातील अनेक भागात पाणी साचले. बऱ्याच ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्याने ड्रेनेज मधील मैलामिश्रीत पाणी सर्वत्र पसरले आहे. पूरपरिस्थितीनंतर आता रोगराई निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे तातडीने औषध व धुरफवारणी करण्यात यावी अशी सूचना स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेऊन केली.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांची अजित गव्हाणे यांनी शुक्रवारी भेट घेतली. यावेळी माजी नगरसेवक पंकज भालेकर, विनायक रणसूभे, धनंजय भालेकर, तानाजी खाडे, रवींद्र आप्पा सोनवणे, संजय बोराडे, प्रसाद कोलते, शरद भालेकर, कल्पेश गोराड, राहुल पवार, पंढरीनाथ गरुड आदी उपस्थित होते.

हेही वाचा     –      ‘एकदा कासव जिंकला म्हणून ससा नेहमीच हरेल’ असे नाही; सुधीर मुनगंटीवार

भोसरी परिसरात बुधवारी रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. गुरुवारी देखील पावसाचा जोर तसाच कायम होता. या पावसामुळे प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींचा अनागोंदी कारभार समोर आला. अनेक नागरिक पावसाच्या साचलेल्या पाण्यात अडकले. अनेकांना राहते घर सोडून स्थलांतरित व्हावे लागले.

भोसरी विधानसभेतील सेक्टर २२ ,रूपीनगर, तळवडे, चिखली, मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती, ताम्हाणेवस्ती, घरकुल, कुदळवाडी, जाधववाडी, भोसरी येथील शांतीनगर, महात्मा फुले नगर या भागातील 300 हून अधिक लघुउद्योजकांचे मोठे नुकसान झाले. अनेक शॉपमध्ये पाणी साचल्याने लाखो रुपयांच्या मशीन खराब होण्याच्या तक्रारी देखील समोर आल्या. याशिवाय दिघी, चहोली, डूडुळगांव, नेहरुनगर, बालाजीनगर, निगडी गावठाण इ. भागात पाण्याचा निचरा न झाल्याने ड्रेनेज मधील मैलामिश्रीत पाणी सर्वत्र पसरले होते. नांगरीकांच्या घरात घुसले होते. शुक्रवारी पावसाला उसंत मिळाली असली तरी सांडपाणी, मैलामिश्रीत पाणी सर्वत्र पसरल्याने रोग-राई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने औषध व धुरफवारणी करण्यात यावी अशी सूचना स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेऊन केली.

भोसरी विधानसभा क्षेत्रातील अनेक भागात सोसायट्यांमध्ये अजूनही पावसाचे पाणी ओसरलेले नाही. याशिवाय गावठाण, चाळी वजा घरे अशा ठिकाणी देखील ड्रेनेज व्यवस्था कोलमडलेली दिसून आली आहे. त्यामुळे रोगराई निर्माण होण्याची शक्यता आहे. असे संकट येण्यापूर्वीच पालिकेने तातडीने पावले उचलावीत. यासाठी आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना तातडीने औषध फवारणी व धूर फवारणी करण्याची सूचना देखील केली.

– अजित गव्हाणे, माजी अध्यक्ष, स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button