breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये मोफत इंजीनियरिंग आणि ऑटोमेशन डिप्लोमामुळे मुली होणार सक्षम

पिंपरी चिंचवड महानगरपालिका व सिंबायोसिस कौशल्य विद्यापीठाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

पिंपरी | इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतून शिक्षण घेतल्यानंतर काय करावे हे कळत नव्हते. त्याचवेळी सिंबायोसिस कौशल्य विद्यापीठाचा डिप्लोमा इन मनुफॅक्चरिंग ऑटोमेशन संदर्भात मला माहिती मिळाली. यासाठी हा निवासी अभ्यासक्रम माझ्याकरिता एक सुवर्णसंधी आहे. अतिशय सुंदर कॅम्पस आणि सतत सहकार्य करणारे ट्रेनर्स, आम्हाला उद्योगांमध्ये प्रत्यक्ष कामावर शिकण्याची मिळणारी संधी यामुळे मला खात्री आहे हा डिप्लोमा पूर्ण करून मी माझ्या कुटुंबियांकरीता आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. मला ही संधी दिल्याबद्दल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मी खूप आभारी आहे, असे मनोगत सिंबायोसिस कौशल्य विद्यापीठात डिप्लोमा इन मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमेशन कोर्सचे शिक्षण घेणाऱ्या साक्षीने व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि सिंबायोसिस कौशल्य व व्यावसायिक विद्यापीठ किवळे यांच्या वतीने एक वर्षांपूर्वी गरजू मुलीं करिता दोन प्रकारचे डिप्लोमा कोर्सेस चालू करण्यात आलेले आहेत. हे डिप्लोमा कोर्सेस पूर्णपणे मोफत व निवासी असून दहावी व बारावी पीसीएम केलेल्या मुली यामध्ये प्रवेश घेऊ शकतात. डिप्लोमा इन मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स हा दहावी नंतरचा डिप्लोमा आहे तर डिप्लोमा इन मनुफॅक्चरिंग ऑटोमेशन हा बारावी नंतरचा डिप्लोमा आहे. मागच्या वर्षी प्रवेश घेतलेल्या मुली सध्या चाकण मधील एका कंपनीमध्ये ऑन द जॉब ट्रेनिंग घेत आहेत, एवढेच नाही तर त्यांना ट्रेनिंगमध्ये स्टायपेंडही मिळत आहे.

हेही वाचा      –       पुण्यातील घरांमध्ये शिरलेला गाळ, चिखल दूर करण्यासाठी युद्धपातळीवर मोहिम हाती घ्यावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हे डिप्लोमा कोर्सेस सिंबायोसिस कौशल्य विद्यापीठ किवळे येथे चालवले जात असून कोर्सेस जर्मन ड्युअल मोडच्या पद्धतीप्रमाणे शिकवले जात आहेत. यामध्ये जास्तीत जास्त वेळ मुलींना प्रॅक्टिकल व ऑन द जॉब ट्रेनिंगमध्ये घालवता येतो. चाकण व पिंपरी चिंचवड मधील विविध कंपन्या या मुलींना इंटर्नशिप व फायनल प्लेसमेंट देण्यास उत्सुक आहेत. सिंबायोसिस कौशल्य विद्यापीठाने अशा प्रकारचे डिप्लोमा कोर्सेस पाच वर्षांपूर्वी सुरू केलेले होते व आत्तापर्यंत शेकडो मुली या डिप्लोमा करून विविध कंपन्यांमध्ये नोकरी करत आहेत. जास्तीत जास्त मुली मॅन्युफॅक्चरिंग ऑटोमेशन व वाहन उद्योगांमध्ये रोजगारासाठी तयार व्हाव्यात जेणेकरून या उद्योगांमध्ये स्त्रियांची भागीदारी वाढेल, हा या डिप्लोमा मागचा हेतू आहे.

दरवर्षी या डिप्लोमा कोर्सेस मध्ये शेकडो मुली प्रवेश घेतात. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ज्या मुली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येतात त्यांच्यासाठी चा ट्रेनिंग व राहण्या खाण्याचा खर्चाचा भार उचलत असून जेणेकरून या भागातील मुली सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग व वाहन उद्योगांमध्ये रोजगार क्षम बनवून आपल्या कुटुंबीयांना मदत सुरू करण्यासाठी सक्षम होतील. या उपक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असून ३० जुलै पर्यंत अर्ज करू शकतात. त्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामध्ये, सिंबायोसिस कौशल्य विद्यापीठ किवळे येथेही मुलींना याबाबत सविस्तर माहिती मिळू शकते.

गरजू विद्यार्थींनींसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाअंतर्गत शिकण्याची जिद्द, आकांक्षा बाळगणाऱ्या विद्यार्थीनी कुशल बनतील आणि त्यातून त्यांच्या सक्षमीकरणास मदत होईल. याद्वारे त्यांना विविध क्षेत्रांमध्ये आपले करिअर घडविण्याची संधी मिळेल आणि नेतृत्व करण्याची क्षमताही त्यांच्यामध्ये निर्माण होईल.

– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button