ताज्या घडामोडीमुंबई

बोरिवली पूर्व भागातील मेट्रो स्टेशनजवळील कनकिया समर्पण टॉवरला आग

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबई : मुंबईतील बोरिवली पूर्व भागातील एका इमारतीला परिसरात भीषण आग लागली आहे. आगीत गुदमरून एकाचा मृत्यू झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, आग आटोक्यात आणण्यात आली आहे.

तीन जण रुग्णालयात दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली पूर्व भागातील मागाठाणे मेट्रो स्टेशनजवळील कनकिया समर्पण टॉवरला आग लागली. आगीत गुदमरल्याने महेंद्र शाह नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर तीन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. रंजना राजपूत, शिवनी राजपूत आणि शोभा सावळे अशी रुग्णालयात दाखल झालेल्यांची नावे आहेत.

२२ मजली इमारतीत आग लागली
अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ही आग विद्युत वायर, विद्युत तारापर्यंत लागली त्यामुळे ही आग कनकिया समर्पण टॉवरच्या पहिल्या ते सहाव्या मजल्यापर्यंतच पोहोचू शकली. ज्या ठिकाणी आग लागली ती २२ मजली उच्चभ्रू निवासी इमारत आहे. सध्या इमारतीत राहणारे इतर लोक सुरक्षित आहेत. आगीचे कारण समोर आलेलं नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button