ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिखली-घरकूलमधील नागरिकांना आमदार लांडगेंचा ‘विश्वास’

महापालिका, पोलीस प्रशासनसोबत ‘ऑन फिल्ड’ पाहणी

पिंपरी : अतिमुसळधार पावसामुळे चिखली- घरकूल परिरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे नागरिक अडकून पडले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांनी आपत्तीग्रस्त नागरिकांची महापालिका आपत्ती व्यवस्थान विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासनाचे अधिकारी यांच्यासोबत भेट घेतली. परिसराची पाहणी करुन नैसर्गिक आपत्तीच्याकाळात आपत्तीग्रस्त नागरिकांना सर्वोतोपरी मदत करण्याचा ‘विश्वास’ दिला.

Chikhli, Gharkul, Citizens, MLAs, Wolves, Vishwas, Municipal Corporation, Police, Administration, 'On Field', Inspection,
Chikhli, Gharkul, Citizens, MLAs, Wolves, Vishwas, Municipal Corporation, Police, Administration, ‘On Field’, Inspection,

गेल्या दोन दिवसांत पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यात अतिमुसळधार पाऊस पडत आहे. पवना धरणक्षेत्रात तसेच इंद्रायणी आणि मुळा नदी प्रवाहापेक्षा जास्त पाणी वाहत आहे. वाढलेले नागरीकरण आणि प्रमाणापेक्षा जास्तीचा पाऊस झाला असून, धरणांमधून विसर्ग केल्यामुळे सखल भागांमध्ये, रस्त्यांवर पाणी साचले आहे. काही नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. चिखली घरकूल परिसरात पावसाने थैमान घातले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.

चिखली घरकुल प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पेठ क्रमांक १७ आणि १९ येथील घरकुल वसाहतीतील नागरिकांना मोठा फटका बसला असून, या पाण्याचा निचरा करण्यासाठी मोठ्या व्यासाच्या पाईपलाईनद्वारे या पाण्याचा विसर्ग करण्याची सूचना आमदार महेश लांडगे यांनी केली. तसेच, नागरिकांना आपत्तीच्या काळात मदतकार्य करावे, अशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत. यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे आणि सहकारी उपस्थित होते.

नैसर्गिक आपत्तीत राजकीय जोडे बाजुला ठेवा : आमदार लांडगे
महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि स्वयंसेवी संस्था, संघटना आपआपल्या परीने मदत कार्य करीत आहेत. नागरिकांना या नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदतीची नितांत गरज आहे. यासाठी राजकीय जोडे बाजुला ठेवून प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. सर्व पक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे की, नैसर्गिक आपत्तीच्या काळात कोणताही राजकीय रंग न दाखवता समाजिक बांधिलकीतून मदतकार्यासाठी पुढाकार घ्यावा. राजकीय टीका-टीपण्णीसाठी नैसर्गिक आपत्ती हे व्यासपीठ होवू नये. नागरिकांना टीका-टीपण्णीची नव्हे, तर मदतीची आवश्यकता आहे, असे आवाहनही आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया :
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस बरसला आहे. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदार संघातील चिखली घरकूल सारख्या सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, वाहतूक पोलीस आणि स्थानिक नागरिकांसह या भागात पाहणी केली. आपत्ती नियंत्रण आणि मदत कार्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. घरकूलमधील नागरिकांना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आपत्तीच्या काळात नागरिकांनी मदतीसाठी सारथी हेल्पलाइन: 8888006666 ◆ परिवर्तन हेल्पलाइन: 9379909090 संपर्क करावा, असे आवाहन करतो.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button