ताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

सिंहगड रोड परिसरात पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण

नागरिकांच्या सुटकेसाठी अग्निशमन दलाला पाचारण, घाट माथ्यावर मुसळधार पाऊस

सिंहगड रोड : पुण्यामध्ये आज मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे सिंहगड रोड परिसरात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या सुटकेसाठी अग्निशमन दलाला पाचारण कराव लागलं असून बोटीच्या सहाय्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी नेलं जात आहे. पुणे जिल्ह्यात आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागाने हा इशारा दिला आहे. नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घाट माथ्यावर मुसळधार पाऊस सुरु आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड तसेच ग्रामीण भागातील खडकवासला, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, आंबेगाव या भागातील शाळांना सुट्टी देण्यात आलीय.

सिंहगड रोड परिसरात रेसक्यु ऑपरेशन सुरु आहे. अजून तिथे मोटार बोट पोहोचू शकलेली नाही. दोरीच्या सहाय्याने अग्निशम दलाच्या बोटीने नागरिकांना बाहेर काढण्याच काम सुरु आहे. स्थानिक पुणेकर या परिस्थितीसाठी प्रशासनाला जबाबदार ठरवत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांच मोठं नुकसान झालं आहे. एका नागरिकाने स्थानिक आमदारांवर संताप व्यक्त केला. माधुरी मिसाळ आणि भीमराव अण्णा तपकीर हे दोन्ही पुण्याचे आमदार आहेत.

माझी तीन दुकानं बुडाली, त्याचा खर्च कोण देणार?
“माधुरी ताईंचा हा वॉर्ड नाहीय, तरी त्या काम करत आहेत. भीमराव अण्णा तापकीर कुठे आहेत? असा सवाल एका स्थानिक पुणेकरांना विचारलाय. निवडणुका असल्या की, प्रचाराला येणार. आज भीमराव अण्णा तापकीर कुठे आहेत? माझी तीन दुकानं बुडाली, त्याचा खर्च कोण देणार?” असा सवाल या नागरिकाने विचारला. नियोजनाने पाणी सोडलं असतं, तर….

“प्रशासनाने कुठलाही अलर्ट दिला नाही. माहिती दिली नाही आणि पाण्याचा प्रवाह सोडला. स्थानिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गाड्या बाहेर काढल्याने मोठी हानी टळली. अजूनही अनेक गाड्या आतमध्ये आहेत” असं एका नागरिकाने सांगितलं. “24 तासात पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस सुरु आहे. त्याचा विचार करुन नियोजनाने पाणी सोडलं असतं, तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती” असं मत एका नागरिकाने व्यक्त केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button